Breaking : bolt
महिलांच्या आरोग्याला प्राधान्य, ठाणे मेनोपॉज क्लिनिकला UNFPA प्रतिनिधींची भेटNHM चा निधी उपलब्ध, तरी हिमोफिलियाग्रस्त रुग्णाचा औषधा विना मृत्यू..?आपला दवाखाना योजनेच्या अहवालात दिरंगाई, पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांना कारणे दाखवा नोटीस..!DAM पदमुक्तीचा ‘राष्ट्रीय कार्यक्रम’ !सीझरच्या शस्त्रक्रियेनंतर पोटात हातमोजे अन् कागद ? बीड जिल्हा रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाने आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह..!“मण्यार आला अंथरुणावर, आरोग्य व्यवस्थेचा कारभार आला चव्हाट्यावर..!”४५ दिवस अंधारात दालनात बसलेला अधिकारी…आणि निलंबनानंतरच दालन मोकळे झाले ?बीडचे जिल्हा हिवताप अधिकारी 89 लाखाच्या अतिरिक्त उचल प्रकरणी निलंबित..!डॉ.नागेश लखमावार, डॉ.संजयकुमार पांचाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई !“निधी मंजूर, तरी लाभार्थी वंचित ! सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्या कारभारावर मायकल डिसोझांचा घणाघाती हल्लाबोल !”

जाहिरात

 

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य, ठाणे मेनोपॉज क्लिनिकला UNFPA प्रतिनिधींची भेट

schedule22 Aug 26 person by visibility 13 categoryमहाराष्ट्रआरोग्य विभाग

सुशांत पोवार (ठाणे) - महिलांच्या आरोग्याची काळजी घेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे सुरू असलेल्या मेनोपॉज क्लिनिकला काल शुक्रवार, दि. २१ रोजी विशेष भेट देण्यात आली. UNFPA India च्या प्रतिनिधी तसेच भूतानच्या Country Director Ms. Andrea M. Wojnar यांनी या क्लिनिकला भेट देऊन महिलांना दिल्या जाणाऱ्या तपासणी, समुपदेशन, उपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाची माहिती घेतली. क्लिनिकची कार्यपद्धती आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
          जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे मेनोपॉज क्लिनिक महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात आवश्यक वैद्यकीय सेवा, योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असला तरी या काळात अनेक शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांना योग्य वेळी वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने अशा क्लिनिकच्या माध्यमातून महिलांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
        महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे, आवश्यक आरोग्यसेवा अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविणे आणि अशा उपक्रमांना भविष्यात आणखी बळ देणे, हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes