Breaking : bolt
सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?फार्मासिस्ट शोधता शोधता अधिकारी थकले, ‘तुम्हीच सुचवा’ म्हणत तक्रारदारच अडले !700 कोटींच्या मेडिकल खरेदी प्रकरणात न्यायालयाचा दणका, सरकारी रुग्णालयांच्या टेंडर व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !डॉक्टरांना दोषी ठरवण्याआधी आरोग्य व्यवस्थेचा ‘एक्स-रे’ करा !गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

जाहिरात

 

महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ नुसार सुधारित शासन निर्णयाप्रमाणे सर्व क्लिनिक, रुग्णालये, प्रसूतीगृह, प्रयोगशाळा, निसर्गउपचार केंद्र यांना बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार नोंदणी बंधनकारक

schedule21 Jul 23 person by visibility 5669 categoryइतर

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - निर्भीड पोलीस टाइम्सने सुरु केलेल्या जैव वैद्यकीय कचरा निर्मुलन चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे कारण आरोग्य विभागाने नुकतेच बॉम्बे नर्सिंग अॅक्ट नुसार हॉस्पिटल व क्लिनिक नोंदणी बाबत नुकतेच पत्र काढण्यात आले आहे.
           सर्व खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर्सना रुग्णालयसाठी बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागात रीतसर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ नुसार सुधारित शासन निर्णयाप्रमाणे सर्व क्लिनिक, रुग्णालये, प्रसूतीगृह, प्रयोगशाळा, निसर्गउपचार केंद्र यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे रीतसर नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे पत्र काढण्यात आले आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर्सनी क्लिनिक, रुग्णालये यांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या रुग्णालयांनी व क्लिनिक यांनी नोंदणी केली आहे त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अधिनियमाप्रमाणे जे डॉक्टर्स रीतसर नोंदणी करणार नाहीत त्यांच्यावर बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार कारवाईचा इशारा पत्राद्वारे आरोग्य विभागाने दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes