सुशांत पोवार (संपादकीय) - नरहरी झिरवाळ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पांढरी टोपी, पांढरा कुर्ता, पायजामा असा वेश कधी कार्यकर्त्यांसोबत नाचल्यामुळे चर्चेत तर कधी मंत्रालयातल्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे चर्चेत पण आपल्या साधेपणामुळे मात्र कायम चर्चेत. सध्या मात्र नरहरी झिरवळ यांची चर्चा एका व्हिडिओमुळे सुरू आहे. व्हिडिओ त्यांच्या शासकीय निवासथानातला असल्याचं सांगण्यात येतय. या व्हिडिओत झिरवळ एका तृतीयपंथ्या सोबत दिसत आहेत. एकाच गादीवर दोघ असल्याच दृश्य या व्हिडिओत दिसलं आणि या व्हिडिओची जोरदार चर्चा होऊ लागली. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात असं काही घडतं, दारू पार्टी होते यावरून झिरवळ यांना धारेवर धरण्यात आलं. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर पकडला पण सध्या राज्यात भोंदू बाबा अशोक खरातच प्रकरण चर्चेत आहे. राजकीय नेत्यांचे फोटो समोर येत आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्यावर आरोप होत आहेत आणि त्याच वेळी राष्ट्रवादीच्याच नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह्य व्हिडिओ समोर आला. साहजिकच एक चर्चा सुरू झाली झिरवाळ अडकले की त्यांना अडकवलं ही चर्चा का होते ? जिरवाळांचा व्हिडिओ कसा समोर आला आणि तो आत्ताच का समोर आला ? यावर निर्भीड पोलीस टाइम्सची एक संपादकीय नजर.......
थेट मुद्द्याला हात घालू मंत्री नरहरी झिरवाळ यात अडकले का ? तर या व्हिडिओत झिरवाळ यांच्या सोबत असलेली तृतीयपंथी व्यक्ती आहे पवन यादव, याआधी पवन यादव महाराष्ट्रातील पहिला तृतीयपंथी वकील बनल्याची बातमी प्रचंड गाजली त्यानंतर त्याची राजकीय नेत्यांसोबतची उटबस वाढली होती कारण नेत्यांसोबतचे बरेच फोटो समोर आले होते अगदी नरहरी झिरवाळ यांच्या सोबतचे फोटोही समोर आले एका फोटोत झिरवाळ पवनला पुष्पगुच्छ देताना दिसतात तर एका फोटोत लोकांच्या गराड्यात पवनचा सत्कार करताना दिसतात त्यामुळे साहजिकच एक गोष्ट लक्षात येते की झिरवाळ आणि पवन यादव यांची जुनी ओळख होती. या पवन यादव बद्दल माध्यमांमधून एक बातमी देण्यात येत आहे त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची, पवन यादववर ब्लॅकमेलिंग, खंडणी असे गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात येतय. पवन यादवचा भाऊ रवी यादवनेही माध्यमांशी बोलताना दावा केला की पवनने आपल्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केला होता. आपल्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पवन, मंत्री नेते अधिकारी यांच्याशी ओळख झाल्यानंतर जवळीक वाढवायचा यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी अक्षयभार व्हिडिओच काढायचा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा त्याच्यावर कुरार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत आता यावरून एक गोष्ट लक्षात येते की पवन यादवचे रेकॉर्ड नीट नव्हतं तो ब्लॅकमेलिंगचा पॅटर्न राबवत होता त्याच पवनची नरहरी झिरवाळ यांच्याशी ओळख वाढली तो झिरवाळ यांच्या शासकीय निवासथानी आला आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी चर्चा सुरू झाली.
आता यावरून नरहरी जिरवाळ या प्रकरणात अडकले असं म्हणता येतं पण इथे एक बेसिक गोष्ट समजून घ्यावी लागते. नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ ज्या रवी यादवने माध्यमांना दिला त्यानेच सांगितलं हा व्हिडिओ सात महिने जुना आहे इथं आहे गोम सात महिने जुना व्हिडिओ आत्ताच बाहेर आला आणि प्रश्न पुढे आला झिरवाळ यांना अडकवलं का ? आता झिरवाळांना अडकवलं का ? या चर्चांना बळ मिळतं ते सध्याच्या परिस्थितीमधून कॅप्टन अशोक खराच प्रकरण १० मार्चलाच पोलीस यंत्रणेच्या आणि पर्यायाने गृह विभागाच्या हाती लागलं होतं पण हे प्रकरण बाहेर आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर, शिंदेचे कॅप्टन खरात सोबतचे फोटो समोर आले आणि राजकीय टाइमिंगची बरीच चर्चा झाली पण या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर या खराच्या मंदिर संस्थांनाच्या विश्वस्त असल्याचं त्यांनी खरातची तुलना पांडुरंगाशी केल्याचं समोर आलं, चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि शिंदेवर निशाणा ठेवून राष्ट्रवादीची विकेट मिळवल्याची चर्चा होऊ लागली. त्यानंतर आता झिरवाळ अडचणीत सापडल्याने राष्ट्रवादीच्याच मंत्र्याचा पुन्हा नंबर लागला. त्यात फेब्रुवारी महिन्यात नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयामध्ये एसीबीने लाचखोरीच्या प्रकरणात ट्रॅप लावून रेड टाकली होती तेव्हा झिरवाळ यांच्या कार्यालयातला लिपिक राजू ढेरिंगे याला पोलिसांनी अटक केली. झिरवळांच कार्यालय सील करण्यात आलं. मंत्रालयात एसीबी छापा टाकत असेल तर साहजिकच याची माहिती गृह विभागाला असणार त्यामुळे गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर झिरवळ्यांच्या ऑफिसवर छापा पडल्याची चर्चा झाली आणि झिरवाळ्यांची फिल्डिंग लागल्याचं बोललं जाव लागलं पण या लाचखोरी प्रकरणात झिरवाळ यांना बॅकफुटला जावं लागलं कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षातून फारस कोणी पुढे आलं नाही. आता झिरवाळांचा व्हिडिओ समोर आला आणि पुन्हा फिल्डिंगची चर्चा वाढली. त्यात अमोल मिटकरींनी एक पोस्ट केली सहा सात महिन्यांपूर्वी झिरवाळ यांचा व्हिडिओ काढून ठेवला तो आत्ताच का बाहेर आला ? राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये एसीबीचा ट्रॅप लावणं आणि नंतर हा व्हिडिओ सात महिन्यांपूर्वी काढून मीडियाला सोपवणं हे झारीतले शुक्राचार्य कोण ?
अशोक खरात प्रकरण अंगलट येतय म्हणून स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतय यातून मिटकरींचा रोक राष्ट्रवादी काँग्रेस मधल्याच एका गटाकडे असल्याची चर्चा सुरू झाली कारण अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या एका गटाची चांगलीच अडचण झाली. रूपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागल्यावर याच गटाकडून लॉबिंग सुरू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे खरे प्रकरण राष्ट्रवादीतल्या एका गटावर शेकत असतानाच झिरवाळ्यांचे प्रकरण पुढे आणत या गटाने स्वतःच झाकून ठेवायचा प्रयत्न करत राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या अंतर्गत काटाकाटीतूनच झिरवाळ्यांची फिल्डिंग लावल्याची चर्चा जोरात आहे. पण व्हिडिओ कुणाच्या सांगण्यावरून बाहेर आला याबद्दल आरोपांचे बाण सुटत असले तरी हा व्हिडिओ कोणी आणि कसा बाहेर काढला हे समजून घेतलं की अडकले की अडकवले याचं उत्तर मिळायला मदत होते.
हा व्हिडिओ मीडियाला देणाऱ्या रवी यादवने माध्यमांशी बोलताना दावा केला की पवनने मला खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली आणि झिरवाळ यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावला. ज्या रूममध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्या रूममध्ये मी सुद्धा झोपलो होतो झिरवाळ यांच्या न कळत हा व्हिडिओ काढला होता पण हा व्हिडिओ मी सात महिन्यांपूर्वी रेकॉर्ड केला होता तेव्हाच मी सीपी साहेबांना याबद्दल पत्र लिहिलं होतं आणि पवन यादव काय करतो याची माहिती दिली होती पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही हा मंत्र्यांचा व्हिडिओ असल्यानं यामध्ये मोठी लोक सुद्धा सहभागी असल्यानं मी घाबरलो आणि त्या भीतीने मी हा व्हिडिओ कुणालाच दिला नव्हता आता मी हा व्हिडिओ माध्यमांमध्ये दिल्यानंतर मला पवन यादव कडून मंत्र्यांच्या ऑफिसेस मधून आणि काही आमदारांकडून धमकीचे फोन यायला लागले आहेत. माझ्या जीवाला धोका तयार झाला आहे पण रवी यादवला हा व्हिडिओ आत्ताच समोर का आणला सात महिन्याआधी धोका होता मग आता हा धोका कसा काय म्हटला असे प्रश्न पत्रकारांनी विचारले तेव्हा या प्रश्नांचे उत्तर रवी यादवकडे नव्हतं. त्यात रवी यादवने आपण नरहरी झिरवाळ यांना याबद्दल माहिती दिली होती. पवनला ट्रान्सजेंडर समितीवर वर पद हव आहे म्हणून तो हे सगळं करत असल्याचा निरोप दिला होता त्या झिरवाळ यांनी मी बघतो एवढंच उत्तर आपल्याला दिलं असा दावा केला. आता त्याचा हा दावा खरा मानला तर झिरवाळ यांना माहिती दिलेली असताना त्याने त्यांचा व्हिडिओ बाहेर का काढला, जर सात महिन्याआधी भीती वाटत होती तर आत्ता व्हिडिओ मीडियाला देताना आणि पुन्हा त्याच मीडियासमोर येताना भीती का वाटली नाही ? आत्ता ज्यांच्याकडून धमक्या येत आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार का केली जात नाही ? जर सीपींना याबद्दल बद्दल माहिती दिली होती तर त्यांनी सात महिन्या आधी कारवाई का केली नाही ? हे प्रश्न साहजिकच आहेत जे झिरवाळ अडकले की त्यांना अडकवलं या प्रश्नाचे उत्तर सूचित करतात.