Breaking : bolt
पुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?बच्चूभाऊ कडूंना आमदारकी मिळणार की फक्त फुगवठा ? पक्ष विलीन करणार का ? सार्वजनिक आरोग्य मंत्रीपद.......?शासनाच्या यादीवर नसणाऱ्या उपकरणांना तांत्रिक मान्यता देणाऱ्या उपसंचलकांच्या विभागीय चौकशीसाठी आज आयुक्तांना निवेदन सादरजिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. वाडीकर, डॉ. देशमुख यांच्यासह तिघे निलंबित पण ही शासनासाठी धोक्याची घंटा.....नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख निलंबित..!गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच, बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', बडा वैद्यकीय अधिकारी गजाआड

जाहिरात

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम

schedule03 Jan 26 person by visibility 97 categoryपुणे

पुणे प्रतिनिधी - ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणे तसेच लोकसहभागातून सक्षम प्रशासन घडविण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. या अभियानात पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करत राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ३८७ ग्रामपंचायती असून, त्यापैकी शासनाच्या निकषांनुसार २८२ ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या ग्रामपंचायतींनी करवसुली, डिजिटल ग्रामपंचायत, डिजिटल शाळा व अंगणवाड्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, अभिलेख अद्ययावतीकरण, ई-गव्हर्नन्स, लोकसहभाग तसेच विविध विकासकामांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन “उत्कृष्ट ग्रामपंचायत” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू लागली आहे.

या अभियानाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दौंड तालुक्यातील गलांडवाडी, बारामती तालुक्यातील काटेवाडी आणि पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी येथे उद्या दि. ५ जानेवारी २०२६ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेते श्री. भाऊ कदम व त्यांची टीम यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गलांडवाडी, काटेवाडी व आडाचीवाडी ग्रामपंचायतींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळी संबंधित तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांच्या विनोदी शैलीतून अभियानाची उद्दिष्टे, लोकसहभागाचे महत्त्व व ग्रामविकासाच्या विविध बाबी प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या माध्यमातून ग्रामस्थांचा सहभाग अधिक बळकट होऊन अभियानास नवी ऊर्जा मिळेल. पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख उपक्रम तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तरी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes