घसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय
schedule03 Jan 26 person by visibility 24 categoryआरोग्य विभाग
बाळासाहेब पाटील (संपूर्ण जीवन आयुर्वेदिक फार्मा.प्रा.लि.) - जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत. हे आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात. याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून मधून कोरडा खोकला येतो. घशात/ टॉन्सिलमध्ये टोचल्यासारखे वाटणे या तक्रारी प्रमुख असतात.
कारणे
विषाणू किंवा जिवाणूमुळे घसादुखी, टॉन्सिलसूज होतात. ब-याच वेळा सर्दी-पडशानंतर हे दुखणे येते. हा आजार सांसर्गिक आहे. याशिवाय रासायनिक प्रदूषण, वावडे (उदा. विशिष्ट खाद्यतेलामुळे), घशास ताण (खूप बोलणे), इत्यादी कारणांमुळे घसा सुजतो.
रोगनिदान
घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठया दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो. कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात. घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळयातल्या रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे. कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र तज्ज्ञाकडे पाठवणे योग्य ठरेल. घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.
उपचार
गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. ब-याच वेळा केवळ एवढया उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात. लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी मधून मधून तोंडात ठेवावी. जंतुदोष आटोक्यात आणण्यासाठी ऍमॉक्सी गोळया उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते. ताप व अंगदुखीसाठी ऍस्पिरिन किंवा पॅमाल गोळया द्याव्यात.
आयुर्वेद