Breaking : bolt
सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?फार्मासिस्ट शोधता शोधता अधिकारी थकले, ‘तुम्हीच सुचवा’ म्हणत तक्रारदारच अडले !700 कोटींच्या मेडिकल खरेदी प्रकरणात न्यायालयाचा दणका, सरकारी रुग्णालयांच्या टेंडर व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !डॉक्टरांना दोषी ठरवण्याआधी आरोग्य व्यवस्थेचा ‘एक्स-रे’ करा !गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

जाहिरात

 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन

schedule04 Jan 26 person by visibility 307 categoryसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या समारभ प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमास सर्वश्री आमदार अॅड. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कोकण प्रादेशिक विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी समीर घारे, अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes