Breaking : bolt
सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?फार्मासिस्ट शोधता शोधता अधिकारी थकले, ‘तुम्हीच सुचवा’ म्हणत तक्रारदारच अडले !700 कोटींच्या मेडिकल खरेदी प्रकरणात न्यायालयाचा दणका, सरकारी रुग्णालयांच्या टेंडर व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !डॉक्टरांना दोषी ठरवण्याआधी आरोग्य व्यवस्थेचा ‘एक्स-रे’ करा !गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

जाहिरात

 

माजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळली

schedule03 Jan 26 person by visibility 520 categoryक्राइम न्यूजपुणे

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - डाॅ.भगवान पवार हे पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी असताना त्यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी पंगा घेतला होता. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सावंत यांच्याकडून बेकायदेशीर टेंडरसाठी दबाव येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. सावंत यांना नडणाऱ्या पवार पुन्हा चर्चेत आले आहेत. आरोग्य सेवकामार्फत लाच स्वीकारण्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सध्या त्यांच्याकडे आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार आहे.
         आरोग्य उपसंचालक विभागातील आरोग्य सेवकाने बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका आरोग्य सेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार (वय ४१) हा आरोग्य सेवक असून, जून २०२५ मध्ये त्यांची उपसंचालक कार्यालय कोल्हापूर मंडळ येथून उपसंचालक कार्यालय पुणे मंडळ येथे अंतरमंडळ बदली झाली होती. मात्र, पुणे मंडळात त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नव्हती. प्राथमिक आरोग्य केंद्र, बावडा (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे रिक्त असलेल्या आरोग्य सेवक पदावर नेमणूक मिळावी, यासाठी त्यांनी विनंती अर्ज केला होता.
          या अनुषंगाने आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची भेट घेतली असता, त्यांनी संशयित रामकिसन घ्यार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर संशयिताने तक्रारदारास मागितलेल्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी डॉ. पवार यांच्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदाराने २ डिसेंबर रोजी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने सापळा रचून रामकिसन गंगाधर घ्यार याला अटक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या सूचनेनुसार निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे करीत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes