Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

दिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्य

schedule04 Jan 26 person by visibility 22 categoryराशिभविष्य

मेष - दिनांक ९, १० हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत, त्यामुळे या दोन दिवसांत जे चालले आहे ते चांगले समजून पुढे चला म्हणजे त्रास होणार नाही. या कालावधीत इतरांची मदत मिळेल याची शक्यता कमी आहे. उलट तुमचाच व्याप वाढेल. तुम्हालाच तुमचे काम सोडून इतरांचे काम करावे लागेल. काम वेळेत न झाल्यामुळे तुमची चिडचिड होईल. म्हणून ‘आपले काम भले नि आपण भले’ हे सूत्र लक्षात ठेवा. तेव्हा या कालावधीत कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करा. कोणावर विश्वास ठेवून निर्णय घेणे त्रासाचे राहील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नये. घरगुती वातावरण चांगले राहील. संततिसौख्य लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल.

वृषभ - या आठवडय़ात असा कोणताच दिवस नाही की तुम्हाला त्रास होणार आहे. उलट तुम्ही जे प्रयत्न करणार आहात त्या प्रयत्नांना भरपूर यश मिळेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. फक्त जे काही काम करायचे आहे त्या कामासाठी पहिले वेळापत्रक तयार करा, म्हणजे काय होईल तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. अगदी वेळ ठरवून ठेवल्याप्रमाणे काम होत राहील. याचा तुम्हाला आनंद होईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. समाजसेवेची आवड राहील व प्रसिद्धीही मिळेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. नातेवाईकांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रकृती ठणठणीत राहील.

मिथुन - या आठवडय़ात सर्व दिवस चांगले असल्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. प्रत्येक वेळी दोन दगडांवर पाय ठेवून काम करावे लागत होते. कुठलेच काम वेळेत होत नव्हते, त्यामुळे काम करण्याची उत्सुकता कमी होत होती. सध्या असे होणार नाही. जे काम तुम्ही हाती घ्याल ते पूर्णत्वाला न्याल. त्यामुळे कामातील उत्साह वाढेल. इतरांच्या मदतीची अपेक्षा नसतानाही मदत मिळेल. चांगल्या गोष्टीचा शुभारंभ होईल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न मनासारखे असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत योग्य ते निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक भार हलका होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल. एकूणच सप्ताह अनुकूल असेल. प्रकृतीत सुधारणा होईल.

कर्क - शुभ ग्रहांची साथ मिळाल्यावर आणखी काय हवे आहे. म्हणजेच हा सप्ताह तुम्हाला आनंदमय असणार आहे. चांगल्या गोष्टींसाठी जरी धावपळ करावी लागली तरी ते काम फत्ते होणार आहे. अशा वेळी मनाला एक उभारी येत असते की, आपण ठरवले आणि ते काम पूर्ण झाले. आणि याचा तुम्हाला अभिमान वाटतो. अशा कालावधीत चांगली संधी मिळेल आणि तिचा पुरेपूर वापर करून घ्या. व्यवसायात अनेक मार्गातून प्रस्ताव येतील. हे प्रस्ताव स्वीकारायला उशीर करू नका. कारण आगामी काळाचा विचार करता हे प्रस्ताव चांगले राहतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताणतणाव कमी राहील. आर्थिक चिंता वाटणार नाही. समाजसेवेची आवड नसली तरी करावी लागेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह - दिनांक ४, ५ हे संपूर्ण दोन दिवस व ६ तारखेला दुपापर्यंत असे हे अडीच दिवस चढ-उताराचे आहेत. तेव्हा या दिवसांत विचार करून निर्णय घ्यावे लागतील. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालणे त्रासाचे होईल. त्यामुळे कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. वादविवादापासून दूर राहा. जो काही पर्यायी मार्ग मिळेल तो स्वीकारा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले जरी असले तरी त्याचे गुंतवणुकीत रूपांतर केले पाहिजे. नोकरदार वर्गाने कामाकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बना. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. नात्यांमध्ये मतभेद निर्माण होणार नाही त्याची काळजी घ्या. मतभेद दूर करा. प्रकृती जपा.

कन्या - ६ तारखेला दुपारनंतर, दिनांक ७ व ८ संपूर्ण दोन दिवस अशा या अडीच दिवसांत ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था होऊन बसणार आहे. काही वेळेला तुमच्याकडे परखडपणा जरी असला तरी तुम्हाला शांत बसावे लागते. कारण आपल्याकडून समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून गप्प बसावे लागते. सध्या अशीच परिस्थिती असल्यामुळे तुम्हाला शांत राहावे लागेल. चांगल्या कामासाठी प्रयत्न वाढवा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये थांबलेल्या गोष्टींना गती येईल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात योग्य ते निर्णय घ्यावे लागतील. आर्थिकदृष्टय़ा खर्च कसा कमी करता येईल ते पाहा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलाल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. योगसाधनेला महत्त्व द्या.

तूळ - दिनांक ९, १० हे दोन दिवस शांत कसे जातील ते पाहा. कारण या दोन दिवसांत नको त्या गोष्टींचा व्याप मागे लागू शकतो. जी गोष्ट करायची नाही अशाच गोष्टी करण्याची इच्छा होईल आणि त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता राहील. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो. कोणतेही काम करताना सहनशीलता ठेवा. योग्य समन्वय साधा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये दमदार पावले पडतील. इतरांची मदत मिळेल. व्यवसायात मेहनतीचे फळ चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांशी बोलताना योग्य मुद्दे मांडावे लागतील. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवेची आवड जरी नसली तरी समाजसेवेत गुंतून राहावे लागेल. मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळतील. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक - भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक राहील. काही दिवस ताणतणावाचे गेलेले असले तरी सध्या मात्र मौजमजेचे दिवस आहेत. तेव्हा ही संधी सोडू नका. आपले मत इतरांनी ऐकावे असे ज्या वेळी वाटत असते, त्या वेळी कोणी ऐकून घेत नसते. सध्या मात्र तुमचे मत काय यासाठी तुमच्याकडेच विचारणा होईल याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. मनमोकळेपणाने मनमुराद आनंद कसा लुटता येईल हे पाहा. व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार वर्गाला स्फूर्ती मिळेल. आर्थिकदृष्टय़ा प्रश्न मिटेल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांना शुभेच्छा द्यायला मानसिक समाधान लाभेल. एकूण सप्ताह भाग्योदयाचा असेल. प्रकृती उत्तम राहील.

धनू - दिनांक ४, ५ हे संपूर्ण दोन दिवस व ६ तारखेला दुपापर्यंत असे हे अडीच दिवस मोठय़ा कसरतीचे असतील. कारण या कालावधीत करायला जाल एक, होईल भलतेच अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला काही सुचणार नाही. केव्हाही लक्षात ठेवा. त्यामुळे कामाचे नियोजन केले नाही तर काम फसणार आहे आणि तुमचे नेहमी नियोजन नसते त्यामुळे काम फसते. मनात आले म्हणून केले असे करणे तुम्हाला त्रासाचे राहील. शिवाय दोन शब्द कमी बोला म्हणजे नुकसान होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात चर्चा करणे टाळा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आरोग्य जपा.

मकर - ६ तारखेला दुपारनंतर, दिनांक ७ व ८ संपूर्ण दोन दिवस म्हणजेच एकूण अडीच दिवसांच्या कालावधीत जपून पावले टाकावी लागतील. ‘एक घाव दोन तुकडे’ करून चालणार नाही. नेहमीप्रमाणे आपल्याच भातावर डाळ मिळावी हे सूत्र सध्या तरी बाजूला ठेवावे लागेल. इतरांचे मत काय, इतरांना काय वाटते याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादी गोष्ट नाही पटली तर सोडून द्या. त्या गोष्टीवर विचार करू नका म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे तोटय़ाचे राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. धार्मिक कार्याची आवड राहील. कुटुंबाची काळजी घ्या.

कुंभ - षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण दुधात मिठाचा खडा टाकणारे आहे. म्हणजे काय की, सध्या आपण जे म्हणाल ती पूर्व दिशा नसणार. काही गोष्टी मनाच्या विरुद्ध होऊ शकतात. याचा राग तुमच्या मनामध्ये असेल. पण रागावर नियंत्रण ठेवायला शिका. कारण राग येणाऱ्या व्यक्तीने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे- अति राग अन् भीक माग. कारण अशा परिस्थितीमध्ये घेतलेले निर्णय नुकसानीचे होऊ शकतात. परिस्थितीवर मात करून ती कशी हाताळता येईल ते पाहा. व्यवसायाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आर्थिक बाबतीत नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. जोडीदाराचा सल्ल्या घ्या. आरोग्याची काळजी घ्या.

मीन - दिनांक ६, ७, ८ हे तीन दिवस अनुकूल नाहीत. त्यामुळे या दिवसांत उचलली जीभ टाळय़ाला लावली असे चालणार नाही. यात दुसरे कोणाचे नाही तर तुमचेच नुकसान होऊ शकते. ज्या गोष्टीचा आपला काहीही संबंध नाही अशा गोष्टींविषयी चर्चा करणे त्रासाचे राहील, त्यामुळे कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत पडू नका. आपल्या वाणीमध्ये गोडवा ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये प्रयत्न वाढवा. नक्कीच यश मिळेल. व्यवसायात कलाकौशल्याला वाव मिळेल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. आर्थिक देवाणघेवाण टाळा. राजकीय क्षेत्रात सध्या उत्साह वाटणार नाही. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मुलांची साथ मिळेल. घरगुती वातावरण ठीक राहील. उपासना फलद्रूप होईल. योगसाधनेला महत्त्व द्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes