Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी तालुकानिहाय कार्यक्रम जाहीर

schedule13 Nov 25 person by visibility 76 categoryसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरणासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस शाखेत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे

               शस्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा. (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे). शस्र वापरण्यास शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र. शस्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form - S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्यानिशी सादर करावा. शस्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्र पडताळणी प्रमाणपत्र. सरपंच/पोलीस पाटील/नगराध्यक्ष/ यांच्याकडील रहिवाशी व वर्तवणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड. मुळ शस्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नुतनीकरण 5 वर्षाकरीता फी रु. 2 हजार 500/- (दोन हजार पाचशे रुपये मात्र) शासन जमा करणे आवश्यक आहे. परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी प्रमाणे 500 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच शस्र परवाना नुतनीकरण करण्यास विलंब झाल्यास सबळ पुरावा अर्जासह सादर करावा. शस्त्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 तहसिलदार कार्यालय येथील सेंतू सुविधा केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अर्ज पोस्टाद्वारे किंवा तालुक्याचे ठिकाणी स्विकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण झालेले शस्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत.

                एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून तालुकानिहाय कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. नेमलेल्या तारखांनाच त्या - त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्र परवान्यासह उपस्थित रहावे. तरी संबंधित परवानाधारकांनी याची नोंद घेऊन नेमून दिलेल्या दिवशी व वेळी (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यवाही करावी.

तालुका नेमून दिलेले दिवस

  • देवगड दि.1, 2,3, डिसेंबर 2025

  • वैभववाडी दि. 4,5, डिसेंबर 2025

  • कणकवली दि. 8,9,10, डिसेंबर 2025

  • कुडाळ दि. 11,12,15, डिसेंबर 2025

  • मालवण दि. 16,17,18, डिसेंबर 2025

  • सावंतवाडी दि. 19,22,23, डिसेंबर 2025

  • दोडामार्ग दि. 24,26, डिसेंबर 2025

  • वेंगुर्ला दि. 29,30,31, डिसेंबर 2025

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes