सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी घेतला वर्धा जिल्हा आढावा
schedule21 Nov 25 person by visibility 155 categoryआरोग्य विभाग
वर्धा प्रतिनिधी - आरोग्य सेवा सचिव डॉ.निपुण विनायक यांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वर्धा जिल्ह्याचा आढावा घेतला आहे त्यामध्ये त्यांनी प्रमुखांच्या भेटी घेतल्या
-
महारोगी सेवा समिती, दत्तपूर येथे रुग्णांशी संवाद.
-
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ आणि सेवा प्रणालीची पाहणी.
-
OPD–IPD, शस्त्रक्रिया कक्ष, रक्तपेढी व विशेष युनिट्सची तपासणी.
-
प्राथमिक आरोग्य केंद्रांतील माता-बाल आरोग्य, लसीकरण आणि NCD तपासणी कार्यक्रमाचा आढावा.
जिल्हाधिकारी श्रीमती वान्मधी सी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपसंचालक डॉ.शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूमत वाघ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांच्यासोबत बैठक घेतली.
मुख्य निर्देश
-
आरोग्य सेवांची गुणवत्ता तातडीने सुधारावी.
-
लसीकरण व NCD स्क्रीनिंगची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत.
-
रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.
-
रुग्णालयांमध्ये स्वच्छता व व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे.