Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

निवृत्तवेतनधारकांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करावे

schedule21 Nov 25 person by visibility 95 categoryकोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी - सन 2025-26 वर्षासाठीचे Digital Life Certificate (ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र) निवृत्तीवेतनधारकांनी नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य असून, पेन्शनधारकांनी दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन कोषागार अधिकारी श्रीमती अ. अ. नराजे यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांसाठी मोबाईलवरून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची प्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी Google Play Store वरून Aadhaar Face RD App तसेच Jeevan Pramaan App डाउनलोड करणे आवश्यक आहे. ॲप उघडल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन/ऑपरेटर आयडेंटिफिकेशन प्रक्रियेअंतर्गत आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी भरून फोटो स्कॅन करावा. पेन्शनर स्वतः किंवा इतर कोणाही व्यक्तीद्वारे ऑपरेटर म्हणून नोंदणी करता येते. ऑपरेटर रजिस्ट्रेशननंतर Pensioner Identification स्क्रीनवर पेन्शनधारकाचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक भरून ओटीपीद्वारे पडताळणी करावी. त्यानंतर उघडणाऱ्या स्क्रीनवर खालील माहिती अचूक भरावी:

Pensioner Office – नाव, Type of Pension – Service / Family, Organisation Type – State Government, Sanctioning Authority – State Government of Maharashtra, Disbursing Agency – Maharashtra State Treasury, Treasury – Kolhapur DTO, PPO No. - अचूक टाकावा, Account No.- अचूक टाकावा, Re-employed - होय/नाही, Re-married – होय/नाही

माहिती तपासून Submit केल्यानंतर मोबाईल कॅमेरा सुरू होऊन चेहरा स्कॅन करावा व डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट करून कन्फर्मेशन द्यावे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्रे व सेतू केंद्रांमध्येही उपलब्ध असल्याची माहिती कोषागार विभागाने दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes