वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट, 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा खंड क्षमापित पत्राचे वितरण
schedule03 Jan 26
person by
visibility 25
categoryआरोग्य विभाग
मुंबई प्रतिनिधी - आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात राज्यातील 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे वितरण करण्यात आले. गेली 20 वर्ष होऊन अधिक काळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी. आपण चांगले काम करावे. तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात आज 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्राचे वितरण करण्यात आले. नुकतेच 150 डॉक्टरांना 'सेवा खंड कालावधी क्षमापित' केले होते. एकूण 345 डॉक्टरांना पत्र देण्यात आले असून, उर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागात 2009 पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. सन 2009 साली या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे. मात्र ‘सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते. वैद्यकीय अधिकारी यांचे संघटने कडून या बाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असुन त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ मिळतील.
आरोग्यव्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा निश्चय करूया, या निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन सह विशेष इन्सेक्टिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली असुन उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांचे संख्या वाढून 2399 करण्यात आली आहे . तज्ञ डॉक्टरांच्या मानधनात ही भरघोस वाढ केली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपसचिव श्री केंद्रे, सहसंचालक श्री.राजेंद्र भालेराव, अवर सचिव श्री गायकवाड, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती कारेगावकर, आरोग्य विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते