Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

श्री मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर येथे राष्ट्रीय विधी सेवा दिन उत्साहात

schedule14 Nov 25 person by visibility 136 categoryआरोग्य विभाग

लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या समान कार्यक्रमानुसार लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लातूर शहरातील जवळपास ११ विद्यालये व महाविद्यालयातील सुमारे २५० एनसीसी कॅडेट उपस्थित हजर होते. या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी मार्गदर्शन केले.

              समाजातील वंचित, गरीब व शोषित घटकांना मोफत व निष्पक्ष न्याय मिळावा, या हेतूने राष्ट्रीय विधी सेवा कायदा १९८७ पारीत करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी ०९ नोव्हेंबर १९९५ पासून करण्यात येत आहे. त्यामुळे म्हणून दरवर्षी ०९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या तीन स्तरावर वंचित, गरीब व शोषित घटकांना मोफत व निष्पक्ष न्याय देण्याचे कार्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत केले जात असल्याचे श्री. गिरवलकर यांनी सांगितले. तसेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार व राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वे यावर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. एम. खरोसेकर, एन.सी.सी. कमांडर संतोष नवगन व यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes