Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

नियमित लसीकरणाबाबत नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आढावा, नांदेड जिल्ह्यात लवकरच 'एचपीव्ही' लसीकरण सुरू

schedule02 Jan 26 person by visibility 22 categoryआरोग्य विभाग

नांदेड प्रतिनिधी - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दि ३० डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय नियमित लसीकरण समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील लसीकरणाच्या विविध निर्देशकांचा (Indicators) सविस्तर आढावा घेण्यात आला आला.या बैठकीत uwin आणि आगामी काळात सुरू होणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेवर विशेष चर्चा करण्यात आली.

ग्रामीण व शहारी भागातील लसीकरणावर भर

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारणतः २ हजार लसीकरण सत्रे व शहरी भागात २५० लसीकरण सत्रे आयोजित केली जातात. या सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालकापर्यंत आणि गरोदर मातांपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी दिले. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन (Micro-planning) करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

'एचपीव्ही' लसीकरण: ३३ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

या बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीची चर्चा झाली आणि मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध होणार हा फार मोठा फायदा होणार आहे . सर्व पात्र लाभार्थ्यांनी या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

लाभार्थी संख्या :- जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येनुसार साधारणतः ३३,००० लाभार्थी या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.

वयोगट :- ही लस १४ वर्षे पूर्ण ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येणार आहे (अर्थात मुलीच्या १४ व्या वाढदिवसानंतर ते १५ व्या वाढदिवसापर्यंत).

विविध निर्देशकांचा आढावा :- जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण इंडिकेटरवाईज प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये प्रलंबित राहिलेली बालके (Left-outs) आणि अर्धवट लसीकरण झालेली बालके (Drop-outs) शोधून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी नियमित लसीकरण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

          या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, शिक्षण अधिकारी माधव सलगर, एस एम ओ लातूर डॉ. अमोल गायकवाड, बाळ रोग तज्ञ विभागप्रमुख,.किशोर राठोड, आयएपी नांदेड डॉ सुहास बेंद्रीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे जिल्हा सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे, शहरी कार्यक्रमाधिकारी सोनुले सुहास,रोहित जोशी तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes