Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

प्राथमिक आरोग्य केंद्र, दौलताबाद येथे कुष्ठरोग शोध मोहिमेचे उद्घाटन

schedule18 Nov 25 person by visibility 108 categoryआरोग्य विभाग

दौलताबाद प्रतिनिधी - राज्यातील मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोग रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र, दौलताबाद येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले आणि मोहिमेची औपचारिक सुरुवात झाली.

या मोहिमेद्वारे संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून, निदान झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार (MDT) सुरू करण्यात येणार आहेत. घरोघर भेटींद्वारे लपलेले व निदान न झालेले रुग्ण शोधणे, त्यांना उपचाराखाली आणणे, संसर्गाची साखळी खंडित करणे तसेच समाजात कुष्ठरोगाबाबत जनजागृती वाढवणे ही मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सन २०२७ पर्यंत ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ हे ध्येय गाठण्याकडे मोहिमेची वाटचाल अधिक वेगाने होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes