Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

कुष्ठरोग शोध मोहीम जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

schedule14 Nov 25 person by visibility 93 categoryसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - जिल्ह्यात एलसीडीसी (LCDC) कुष्ठरोग शोध मोहीम दिनांक 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी स्वेच्छेने स्वतःची कुष्ठरोगांबाबत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे.

                       मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील डॉ. कुष्ठरोग सहाय्यक संचालक सतीश गुजलवार, व सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष माडगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मठकर इतर समन्वय समिती सदस्य आदी उपस्थित होते.

                          सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलसीडीसी (LCDC) कुष्ठरोग शोध मोहीमे अंतर्गत जिल्ह्यात एकूण 607 पथकामार्फत 7 लाख 79 हजार 434 लोकसंख्येचे कुष्ठरोग आजाराचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत घरोघरी येणाऱ्या सर्व्हेक्षण पथकामार्फत सर्वांनी आपल्या शरीराची कुष्ठरोगाबाबत तपासणी करून घ्यावी, आरोग्यपथकास सहकार्य करावे. या मोहिमेच्या अनुषंगाने आरोग्य शिक्षण उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून जिल्हा कुष्ठमुक्त करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

                            शासनाच्या गॅझेटनुसार कुष्ठरोग हा नोटीफायवल आजार म्हणून घोषित करण्यात आलेला असल्यामुळे सर्व कुष्ठरुग्णाची नोंद शासकीय दवाखान्यात करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सात दिवसांच्या आत्त नजीकच्या सरकारी दवाखान्यात रुग्णाची नोंद करणे आवश्यक आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes