Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

राष्ट्रनिर्मितीमध्ये जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान- राज्यपाल आचार्य देवव्रत

schedule19 Nov 25 person by visibility 91 categoryपुणे

पुणे प्रतिनिधी - जेबीएम समुहाने रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्वच्छ ऊर्जा, ऑटोमोबाईल उत्पादन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय काम केले आहे. उद्योग उभारणीसोबतच राष्ट्र-निर्मितीतही जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

जेबीएम समूहाच्या आयोजित 'सर्वोत्कर्ष' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेबीएम समूहाचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार आर्य, उपाध्यक्ष निशांत आर्य, आर्य समाजाचे प्रतिनिधी विनय आर्य, डॉ. संजय कुलकर्णी, कमलेश गुप्ता, सुशील बिंदल,जेबीएम समूहाचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, भारताचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी ‘स्वदेशी’, ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच दिशेने वाटचाल करतांना जेबीएम समूहाने देशातील ६० आणि विदेशात १७ उद्योग संस्थांच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार दिला आहे. येथे तयार होणाऱ्या पर्यावरणपूर्वक बसेस विदेशातही निर्यात करुन देशाच्या जीडीपीमध्ये वाढ करण्याचे काम होत आहे.

जेबीएम समूहाच्यावतीने अध्यक्ष सुरेंद्रकुमार आर्य यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून ते पुढे म्हणाले, महर्षी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, मुल्य, नशा मुक्ती अभियान, महिलांना सन्मानाने वागणूक, शिक्षणाच्या अधिकाराला प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा, बालविवाह अशा कुप्रथेला आळा घालून समाजिक परिर्वतनाचे मोठे कार्य त्यांनी केले. स्वातंत्र्याच्या लढ्यातही आर्य समाजाने सक्रीय सहभाग घेतला. महर्षी दयानंद सरस्वती आणि आर्य समाजाच्या कार्याची प्रेरणा घेवून संपूर्ण आर्य कुटुंबीय वाटचाल करीत आहेत. ‘सर्वाच्या कल्याणातून आपले कल्याण’ ही वृत्ती जोपासत जेबीएम समुहाने सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे समाजसेवा आणि वंचितांच्या कल्याणासाठी करीत असलेले कार्य प्रेरणादायी आहे, यापुढेही समुहाने देश व समाजाच्या कल्याणारिता कार्य करीत राहावे, असे आवाहनही श्री. देवव्रत यांनी केले.

कार्यकामापूर्वी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या हस्ते 'हॉट स्टॅम्पिंग' या प्रकल्पाची पायाभरणी करुन कोनाशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर)' तपासणीकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. या रुग्णवाहिकेद्वारे मुलीच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी जेबीएम उद्योग समूहातील उत्पादनाविषयी माहिती घेवून समाधान व्यक्त केले.

श्री. सुरेंद्रकुमार आर्य यांनी जेबीएम समूहाद्वारे राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. श्री. विनय आर्य यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes