Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

लाच प्रकरणी उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयामार्फत खुलासा

schedule13 Nov 25 person by visibility 64 categoryक्राइम न्यूज

कोल्हापूर प्रतिनिधी : उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. जिल्हाधिकारी कार्यालयातील मोबदला वाटपाबाबत किंवा कोणत्याही कामासाठी कोणताही कर्मचारी अथवा त्रयस्थ व्यक्ती पैशांची मागणी करत असल्यास त्यास बळी पडू नये. तसेच याबाबत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. यांच्याकडे समक्ष भेटून त्यामध्ये कोणत्याही कामामध्ये शंका असल्यास शंका निरसन करुन घ्यावे. सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत अभ्यागतांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेली आहे. त्याशिवाय इतर दिवशीही उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. हे कोणत्याही बैठकीत व्यस्त नसतील तर त्यांना भेटून आपले प्रश्न सोडवावेत, असे आवाहन भूसंपादन उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.

                  भूषण महावीर पाटील, बापूसो बाळगोंडा पाटील व सावित्री बापूसो पाटील, सर्व रा. रेंदाळ ता. हातकणंगले कोल्हापूर यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर कार्यालयाकडे मौ. रेंदाळ, ता. हातकणंगले येथील गट नं. 987 मधील क्षेत्र 0.60 हे. आर जमीन दूधगंगा डावा कालवामध्ये संपादन झालेली असल्याने मोबदला मिळण्याबाबत 4 सप्टेंबर रोजी अर्ज दिला होता. त्रुटी पुर्ततेनंतर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6 यांचे समक्ष संबंधित खातेदारांना स्वाक्षरीकरिता बोलविण्यात आले होते. 12 नोव्हेंबर रोजी आधारकार्ड पडताळणी पूर्ण केल्यानंतर मोबदला वाटप व्हॉवचरवर संबंधित खातेदार यांची समक्ष स्वाक्षरी घेऊन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. यांनी स्वाक्षरी केलेली होती.

                ही घटना प्रकरणांवर स्वाक्षरी झाल्यानंतर घडलेली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट होते. ही वस्तुस्थिती असून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 6. हे नागरिकांना भेटीसाठी कार्यालयीन वेळेत उपस्थित असतात. कार्यालयीन कामाजातही ई-ऑफीस प्रणालीचा दैनंदिन वापर केला जात असून त्याव्दारे नागरिकांच्या अर्जावर मुदतीत कार्यवाही केली जाते, असेही उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes