Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळावा संपन्न

schedule19 Nov 25 person by visibility 74 categoryपुणे

पुणे प्रतिनिधी - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि चंदादेवी चारिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळाव्याचे मांगल्य कार्यालय, बुधवार पेठ, पुणे येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

अध्यक्षीय भाषणात विशाल लोंढे यांनी तृतीयपंथी नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व समाज कल्याण विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. तृतीयपंथी नागरिकांनी शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नशामुक्त भारत अभियानानिमित्त उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. अभिनय कुंभार (IRS) यांनी तृतीयपंथी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अभिनय कुंभार, प्रधान आयुक्त, आयकर विभाग, पुणे व हृषीकेश रावले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमास चंदादेवी चारिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथी नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रमुख तसेच सुमारे २०० तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे संजीव अग्रवाल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

यावेळी कार्यक्रमाच्या औचित्याने विविध शासकीय विभागांमार्फत सेवा-सुविधांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, परिमंडल-ई रेशनिंग कार्यालय मार्फत शिधापत्रिका सेवा, उपजिल्हाधिकारी (महसूल) कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजनेची माहिती, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम नोंदणी तसेच भूसंपादन अधिकारी, नोडल ऑफिसर-४ मार्फत आधार अद्ययावत करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे २०० पारलिंगी माता-भगिनींनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes