सुशांत पोवार (निवडणूक संपादकीय विशेष) - लोकसभासाठीच्या ७ व्या टप्प्यातले मतदान पार पडले आणि आता सर्वांचे डोळे जे आहेत ते निकालाकडे लागले आहेत. पण त्याच्या आगोदरच काल साडेसहा पासून एक्झिटपोलचे आकडे यायला लागले आहेत. आणि आता याच्यातून बीजेपी पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता काबीज करणार कि इंडिया आघाडी त्यांना सत्तेतून खेचणार हाच एक प्रश्न तेव्हडा समोर आहे.एक्झिटपोल नुसार त्या देशामध्ये नेमका मूड काय आहे एकूण जनतेचा हे समोर येत असते. आता हे लोकसभेच्या ७ व्या टप्प्यातले मतदान होण्यासोबतच ओडीसा, आंध्रप्रदेश अरुणाचलप्रदेश आणि सिक्कीम इथे सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यांचे सुद्धा निकाल येत्या काही काळामध्ये आपल्याला दिसून येतील. आता हे एक्झिटपोलचे जे आकडे असतात हे काही एक्झाट आकडे नसतात निवडणूक निकालाचे जे आकडे असतात हे एक्झाट आकडे आहेत पण तरीसुद्धा एक्झिटपोल नुसार एकूण मूड समजत असतो एकूण वारे कोणत्या दिशेला वाहते हे समजत असते.आणि आज आपण सुद्धा हेच आकडे जाणून घेणार आहोत एक्झिटपोल नेमका काय सांगतो. वेगवेगळे एक्झिटपोल समोर येताना दिसत आहेत ह्या सर्व एक्झिटपोलमधून शेवटी निष्कर्ष काय काढता येऊ शकतो हेच आपण समजून घेऊ.
या लोकसभेसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या दोघांमध्ये थेट लढत झालेली होती. एनडीए कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते इंडिया आघाडी कडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार होता हे काही अजून समोर आलेले नाहीये. पण तरीसुद्धा ह्या एक्झिटपोलनुसार हे स्पष्ट होताना दिसत आहे कि नरेंद्र मोदी हे परत एकदा पंतप्रधान होऊ शकतात.
रिपब्लिक टीव्ही जी आहे त्यांच्या या परीक्षणानुसार एनडीएला ४८ टक्के जागा मिळतील. इंडिया आघाडीला ३९ टक्के जागा मिळतील आणि इतरांना १३ टक्के जागा मिळतील. हे जर का आपण आकड्यामध्ये बघितले तर एकूण ५४३ जागा पैकी एनडीएला ३५९ जागा मिळू शकतात, इंडिया आघाडीला १५४ जागा मिळू शकतात आणि इतर जे आहेत त्यांना ३० जागा मिळू शकतात. म्हणजे या ठिकाणी नरेंद्र मोदी हे स्पष्टपणे बहुमताकडे जाताना दिसत आहेत. आणि हे विक्रमी बहुमत असू शकते. मॅटराईज एक्झिटपोल नुसार एनडीए आघाडीला ३५३ ते ३६८ जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळू शकतात आणि इतरांना ४३ ते ४८ जागा मिळू शकतात. याच्यासोबतच इंडिया न्यूज यांच्यानुसार एनडीएला ३७१ जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला १२५ जागा मिळू शकतात आणि इतरांना ४७ जागा मिळू शकतात. आणि टीव्ही फाईव्ह तेलगु यांच्या एक्झिटपोलनुसार एनडीए आघाडीला ३५९ जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला १५४ जागा मिळू शकतात आणि इतर जे आहेत त्यांना ३० जागा मिळू शकतात. म्हणजे येथे सुद्धा पी मार्क यांचेच आकडे रिपीट झालेले दिसून येतात.
आता याचे जर का आपण अॅव्हरेज काढायचे झाले तर हे स्पष्टपणे दिसत आहे कि एनडीए आघाडी जी आहे यांना ३५० हून अधिक जागा मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि बहुमत जे आहे हे बहुमतापेक्षा खूप पुढे असलेले आकडे सुद्धा आहेत हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यासोबतच जन कि बात जे आहे त्याच्या एक्झिटपोलनुसार एनडीएला ३६२ ते ३९२ जागा या सर्वाधिक जागा या जन कि बात ने सांगितल्या आहेत. इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा आणि इतरांना १० ते २० जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्येसुद्धा बीजेपीला एकट्या पक्षाला ३२७ जागा मिळू शकतात त्याच्यामध्ये प्लस मायनस १५ जागा होऊ शकतात असे त्यांनी सांगितले आहे. आणि कॉंग्रेसला ५२ जागा मिळू शकतात ह्याच्यामध्ये प्लस मायनस १० जागा होऊ शकतात हे स्पष्ट आहे. म्हणजे परत एकदा सलग तिसऱ्यांदा बीजेपी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना या एक्झिटपोलमधून आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. टीव्ही नाईन नुसार एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळताना दिसत आहेत इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळताना दिसत आहेत आणि इतरांना ४३ ते ४८ जागा मिळताना दिसून येत आहेत. आता सर्वात शेवटी एबीपी सी वोटर्स यांच्या एक्झिटपोल नुसार एनडीए आघाडीला ३५३ ते ३८३ जागा मिळताना दिसून येत आहेत. इंडिया आघाडीला १५२ ते १८२ जागा मिळताना दिसून येत आहेत आणि इतर ४ ते १२ जागा असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
आता ह्या सर्व आकडेवारीवरून हे तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे कि बीजेपीने सुरुवातीला जो नारा दिला होता “ अबकी बार ४०० पार ” ४०० पार तरी एक्झिटपोलनुसार होताना दिसत नाही पण त्याच्या जवळपास ते निश्चितपणे जाताना दिसत आहेत. बहुमताचा आकडा ते सहजपणे आपल्याला गाटताना दिसत आहेत. ह्याचा अर्थ हा आहे कि नरेंद्र मोदी हे विक्रमी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत असे हे एक्झिटपोलचे आकडे आपल्याला सांगत आहेत. आता सोशल मिडियावरती जर का आपण बघितले तर सोशल मिडियावर वेगळे चित्र दिसत आहे आणि एक्झिटपोल जे आहे ह्या एक्झिटपोल मध्ये वेगळे चित्र दिसत आहे. पण आजवरचा जो काही इतिहास बघितला तर एक्झिटपोल च्या जवळपास जाणारे आकडेच निवडणूक निकालाच्या दिवशी आपल्याला दिसून येतात.त्याच्यामुळे ह्या एक्झिटपोलनुसार जर का आपण गेलो तर हेच आपल्याला स्पष्टपणे आपल्याला म्हणता येईल एनडीए आघाडी जी आहे त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि कदाचित तेच येणाऱ्या लोकसभेमध्ये सरकार स्थापन करू शकतात.