औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?
schedule24 Mar 25
person by
visibility 77
categoryक्राइम न्यूज
सुशांत पोवार (कोल्हापूर) - राज्यातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये निकृष्ट, तसेच बोगस औषधांचा पुरवठा झाल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर सरकारने यासंदर्भात अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. रुग्णालयांना जे उत्पादक, तसेच पुरवठादार औषधांचा पुरवठा करतात त्यांनी प्रतिज्ञापत्रावर कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाची नोंद नाही, तसेच यापूर्वी सदोष औषधपुरवठ्यासंदर्भात कायदेशीर कारवाई झालेली नाही, अशी लेखी हमी देणे बंधनकारक असेल. ही माहिती खोटी आढळल्यास संबंधित उत्पादक किंवा पुरवठादारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.