Breaking : bolt
सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?फार्मासिस्ट शोधता शोधता अधिकारी थकले, ‘तुम्हीच सुचवा’ म्हणत तक्रारदारच अडले !700 कोटींच्या मेडिकल खरेदी प्रकरणात न्यायालयाचा दणका, सरकारी रुग्णालयांच्या टेंडर व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !डॉक्टरांना दोषी ठरवण्याआधी आरोग्य व्यवस्थेचा ‘एक्स-रे’ करा !गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

जाहिरात

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

schedule01 Jan 26 person by visibility 393 categoryसांगली

सांगली प्रतिनिधी - सांगली, मिरज व कुपवाड मनपा निवडणूक-2025, विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 30 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 30 डिसेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 14 जानेवारी 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

schedule21 Mar 25 person by visibility 659 categoryसांगली

सुशांत पोवार (कोल्हापूर) - विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 20 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 20 मार्च 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 3 एप्रिल 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

जाहिरात

Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

Settings
Theme
themes