बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा
schedule21 Mar 25 person by visibility 52 categoryकोल्हापूर

सुशांत पोवार (कोल्हापूर) - बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्याची बाब विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांच्यामार्फत Training workshop on "Biofloc Aquaculture"- "बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत प्रशिक्षण कार्यशाळा दि. २० ते २१ मार्च २०२५ रोजी कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये शास्त्रोक्त बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाची माहिती व प्रात्यक्षिक समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ञ अधिकारी व अनुभवी बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) प्र.के.सुर्वे यांनी दिली आहे.