संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) - सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून २५ मार्च रोजी निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. सदर निविदेमध्ये त्रुटी तथा नियोजनबद्ध स्पर्धा कमी करण्याच्या हेतूने जीइएम अधिनियम जीएफआर आणि महाराष्ट्र शासन खरेदी धोरण यांचा विपर्यास करून इतर संभाव्य आणि दर्जात्मक सेवा देणाऱ्या अन्य पुरवठादारांना निविदेमध्ये सहभागी होणेस प्रतिबंध करून निविदा प्रसिद्ध केली असून त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांना फेर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी आदेश देण्यात यावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग संपर्क प्रमुख सुशांत पोवार यांनी आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांनी २५ मार्च रोजी Sterile Hypodermic Syringe आणि Urine Collection Bag खरेदीसाठी निविदा प्रकाशित केली आहे. सदर निविदेमध्ये महाराष्ट्र शासन निर्णय १ डिसेंबर २०१६ मधील नियमानुसार किमान ३ ब्रँँडसाठी निविदा मागविणे अनिवार्य असताना केवळ एकाच ठराविक विशिष्ट ब्रँँड घेऊन चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविल्याने निविदेचा हेतू प्रती संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन निर्णय १ डिसेंबर २०१६ मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत असल्याने आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निविदेन देण्यात आले आहे. निविदेनामध्ये आठ गंभीर त्रुटींचे विश्लेषण करून सांगिले असून सदरची राबविलेली निविदा रद्द करून फेर निविदा काढण्याची मागणी केली असून यामध्ये गरज वाटल्यास चौकशी समितीची स्थापना करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदरची निविदा आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांच्यासह जिल्हाधिकारी सांगली यांना हार्डकॉपी देण्यात आली असून ईमेलद्वारे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य सेवा, आयुक्त आरोग्य सेवा, सहसंचालक रुग्णालय राज्यस्तर आरोग्य सेवा संचालनालय मुंबई, सहसंचालक तांत्रिक, आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले आहे.