मुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंद
schedule04 Sep 25
person by
visibility 39
categoryक्राइम न्यूजसांगली
संजय तोडकर (सांगली) - दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ०९.३० वा चे सुमारास एरंडोली येथे राहणाऱ्या दाम्पत्यास मुल होण्याचे औषध देतो असे सांगुन देवाऱ्याच्या खोलीत बसवुन फिर्यादीचे पत्नीस तिचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने ब्लाऊज पिस वर ठेवून २० मिनीटे जागेवरून उठायचे नाही तसेच कोणासोबत बोलायचे नाही असे सांगून, तोपर्यत आरोपीने त्याचेकडील चार चाकी वाहनातुन मंदीरात जावून येतो असे सांगून सदरचे दागिने पितळी हंडयात ठेवून घेवून निघुन जाण्याची घटना घडली. संशयित परत न आल्याने फिर्यादीचे दागिने चोरी करून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गुं. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मालमत्तेचे चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते. त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकॉ / सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा निमनिरगाव ता. इंदापुर येथीलसंशयिताने केला असून तो सध्या सांगली शहरामध्ये चार चाकी वाहनातुन फिरत आहे. नमुद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे माधवनगर परीसरात निगराणी करीत जात असताना जुना जकात नाका येथे नमुद वर्णनांचे चार चाकी वाहन येत असताना दिसले. त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व पथकाने सदर वाहनास थांबवून वाहन चालकास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून संशयिताचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नागेश राजु निकम, वय ३६ वर्षे, रा. निमशिरगाव, ता. इंदापुर, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी त्यास मिळाले बातमीची थोडक्यात हकीकत सांगून त्याची व त्याचे ताब्यातील चार चाकी वाहनाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, सदर चार चाकी वाहनाच्या डिकीमध्ये पितळेचा हंडा मिळून आला तसेच चालकाचे शेजारी असले गिअरचे समोरील बाजुस कापडामध्ये बांधुन ठेवलेले सोन्या चांदीचे वरील वर्णनाचे दागिने मिळून आले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी नागेश निकम याचेकडे सदर हंडा आणि दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरचा हंडा आणि दागिने हे मी दोन दिवसापुर्वी मिरज तालुक्यातील एरंडोली गावातील दाम्पत्यास मुल होण्याचे औषध देण्याचे बहाण्याने फसवणूक करून चोरी केलेले असल्याची कबुली दिली. सदर बाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेले चार चाकी वाहन पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे. सदर संशयित व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे. ( सतिश शिंदे ) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली करत आहेत.