Breaking : bolt
“निधी मंजूर, तरी लाभार्थी वंचित ! सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्या कारभारावर मायकल डिसोझांचा घणाघाती हल्लाबोल !”“एका महान सुपुत्राची चिता अजून धगधगतेय… आणि सत्तेच्या लोकार्पणाची दिवाळी उजळतेय ! १८ ऑगस्टनंतर पुन्हा दौरा, मग ९ ऑगस्टची घाई कशाला..?”सावंतवाडीच्या इतिहासाचे काटे थांबले, प्रशासनाची वेळ कधी येणार ?“मंत्री - अधिकाऱ्यांची नावे पत्रिकेत झळकली… सिव्हिल सर्जन मात्र गायब !”साताऱ्यातील वाईच्या रुग्णालयात औषध की विषाचा डोस..?"ज्याने तुमच्या घरातील तीन पिढ्या सांभाळल्या... त्या डॉक्टरला तुम्ही एका झगमगत्या बोर्डासाठी विसरलात का..?"काळालाही हरवणारा शिक्षणमहर्षी...! पद्मश्री डॉ.डी. वाय.पाटील यांना 'निर्भीड पोलीस टाइम्स'ची कृतज्ञ आदरांजली"प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ला ? आधी पत्रकारांची बदनामी, आता मंत्र्यांच्या नावाने अफवा पसरवल्याचा दावा..?"'पदे रिक्त... कारभार अतिरिक्त, महत्वाच्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी अतिरिक्त कार्यभाराची संस्कृती किती दिवस सुरु राहणार...?"औषधांशिवाय ग्रामीण रुग्णालये... नियोजनातील हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना, वाढत्या जनआक्रोशासमोर आरोग्यमंत्र्यांची खरी परीक्षा..!"

जाहिरात

 

सिंहगड परिसरातील वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

schedule21 Nov 25 person by visibility 330 categoryपुणे

पुणे प्रतिनिधी - पुणे ग्रँड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापन लक्षात घेता मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ००:०१ वा. ते २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २४:०० वा. तसेच २४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २४ वा. ते २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २५ वा. या कालावधीत सिंहगड परिसरातील खालीलप्रमाणे वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या कालावधीत सिंहगड किल्ला मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. मौजे पानशेत, खानापूर, डोणजे, अतकरवाडी या बाजूने सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात येत आहे.

उक्त परिसरातील नागरिकांनी डोणजे चौक – खडकवासला – किरकटवाडी – नांदेड सिटी – वडगाव धायरी मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ (पुणे–बेंगळुरू महामार्ग) वापरून खेड-शिवापूरकडे प्रवास करावा. नागरिकांनी स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी वाहतूक यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes