Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

पुण्यात मतदान साहित्य वितरण व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

schedule16 Nov 24 person by visibility 137 categoryपुणे

आकाश भारतीय (पुणे) - पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान साहित्य व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला, अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प येथे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणाला निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, प्रशिक्षण कक्षाचे नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर, २० मतमोजणी पर्यवेक्षक, २० मतमोजणी सहायक व २० मायक्रोऑब्झर्व्हर उपस्थित होते.

मतमोजणी कक्षाची रचना, मतमोजणी टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधींच्या जागा याबाबत सविस्तर माहिती देऊन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भंडारे यांनी मतमोजणीसाठी उपस्थित राहण्याची वेळ, मतमोजणी बाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रशिक्षणार्थींना मतमोजणी टेबलवर उपस्थित राहणाऱ्या मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व मायक्रोऑब्झर्व्हर यांची कामे स्पष्ट करुन देण्यात आली. तसेच १७ सी फॉर्मचा दुसरा भाग समजावुन दिला, ज्यावर मतदानाची आकडेवारी नमूद केलेली असते.

मतदान साहित्य (इव्हीएम मशीन, स्टेशनरी, लिफाफे) वितरण करणे व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा संकलित करणे यासाठी तयार करण्यात आलेल्या साहित्य वितरण पथकातील १२० अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. कर्मचाऱ्यांची ३० पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये ४ व्यक्ती कार्यरत असणार आहेत. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नेमून दिलेल्या टेबलवर उपस्थित राहून मतदान केंद्राचे ईव्हीएम मशीन व स्टेशनरीचे वाटप करणे, वाटप करतांना मतदान केंद्रांना त्याच केंद्राचे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मिळतील याची दक्षता घेणे, तसेच २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व साहित्य संकलीत करणे, साहित्याचे संकलन करताना व्हीव्हीपॅटचे नंबर व सील तपासून घेणेबाबत आणि संविधानिक व असंविधानिक लिफ़ाफ़े तपासुन पहाणे बाबत सूचना देण्यात आल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes