Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमध्ये गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर दुखापत

schedule19 Nov 24 person by visibility 98 categoryराजकीय घडामोडी

वृत्तसंस्था -  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमध्ये गाडीवर दगडफेक झाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीची काच फुटली आहे. तसंच अनिल देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दगडफेकीत देशमुख जखमी झाले आहे. त्यांच्यावर काटोलमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिल देशमुखांवरील हा हल्ला म्हणजे स्टंटबाजी असल्याचं म्हणत भाजपकडून आरोप फेटाळण्यात आलेत.

                   अनिल देशमुख यांच्या ज्या गाडीवर दगडफेक झाली ती गाडी tv9 वर… पारडसिंगा जवळील बेल फाटा परिसरात अंधाराचा फायदा घेत दगडफेक करण्यात आली. गाडीची समोरची काच अनिल देशमुख बसले होते. त्या भागाकडून पूर्णतः ब्रेक झाला आहे. मोठा दगड काचेवर पडला त्यामुळे काच फुटली आहे. पोलिसांकडून गाडीची तपासणी केली जात आहे. पोलीस सगळ्या बाजूने तपासणी करत आहेत.काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आली आहे. सलील देशमुख यांची शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांनी जखमी झाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes