Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

निवडणूक खर्च अनुषंगिक यंत्रणांचा घेतला आढावा

schedule17 Nov 24 person by visibility 169 categoryसांगली

संजय तोडकर (सांगली) - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी मतदानपूर्व 72 तासात मतदान प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या आर्थिक बाबींची सतर्कतेने तपासणी करून, आवश्यकेनुसार कारवाई करावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित निवडणूक अनुषंगिक खर्च यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, निवडणूक खर्च निरीक्षक करणी दान, बुरा नागा संदीप, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह खर्चविषयक सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात होण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना करून विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन म्हणाले, विविध ठिकाणच्या गोदामांवर छापे टाकून संशयित बाबींची तपासणी करावी. निवडणुकीच्या काळात मद्य, पैशांची अवैध वाहतूक किंवा इतर आमिषांच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवण्यात यावे. महाराष्ट्र किंवा कर्नाटक सीमेवरील लगतच्या जिल्ह्यातून अवैध मद्य वाहतुकीबाबत यंत्रणांनी कसून तपासणी करावी. आंतरराज्य सीमांवरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी एफएसटी, एसएसटी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) पथकांच्या मदतीने निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणिकरण, सी- व्हिजिल आदिबाबत माहिती दिली. तसेच, बैठकीत विशेष खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत खर्च विषयक संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. राजा दयानिधी यांनी सूचित केले.

यावेळी विविध यंत्रणांनी निवडणूक विषयक सर्व खर्चाच्या अनुषंगाने करण्यात आलेली कारवाई व नियोजनाबाबत माहिती दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes