पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू
schedule17 Nov 24
person by
visibility 129
categoryपुणे
आकाश भारतीय (पुणे) - जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहे.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सदर वेळेत वाणिज्यीक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, भ्रमणध्वनी, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले, व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व चिन्हांचे प्रदर्शन निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस जवळ बाळगणे, वापरणे अथवा खासगी वाहन प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३चे कलम १६३ अन्वये मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.