मतदान जनजागृतीसाठी व्यावसायिकांचा सहभाग अभिनंदनीय - जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule18 Nov 24
person by
visibility 119
categoryक्राइम न्यूजकोल्हापूर
संदीप कुंभार (कोल्हापूर) - लोकशाहीच्या समृध्दीसाठी प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असे आवाहन करत मतदानवाढीच्या जनजागृतीसाठी व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मतदान करणाऱ्यांना विविध सवलती देणाऱ्या व्यावसायिकांचे व व्यवसायी संघटनांचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अभिनंदन केले.
मतदानासाठी विविध सवलती देणाऱ्या व्यावसायिकांनी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेवून मतदारांना देण्यात येणाऱ्या सवलतींबाबत माहिती दिली. यावेळी स्वीप टीमचे सहायक नोडल अधिकारी निलकंठ करे, वर्षा परीट, सोने चांदी कारागीर बहूद्देशीय असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष नचिकेत भुर्के, हरभोले कॅफेचे राजेंद्रकुमार सुतार, सयाजी हेअर ॲंड ब्युटी कन्सेंप्टसचे मालक सयाजी झुंजार, अतूल टिपूगडे यांच्यासह विविध व्यावसायिक उपस्थित होते.
सोने, चांदी कारागीर बहूद्देशीय असोसिएशने "बोटावरची शाई दाखवा" आणि दागिन्यांच्या मजुरीवर 20 टक्के सूट मिळवा, हरभोले कॅफे यांच्या वतीने बोटावरील शाई दाखवा आणि 1 दाबेली किंवा 1 हॉट कॉफी फ्री तर सयाजी हेअर ॲंड ब्युटी कन्सेंप्टच्यावतीने बोटावरची शाई दाखवतील अशा सर्व मतदारांना सर्व सेवांवर 20 टक्के सवलत अशा सवलती दिल्या आहेत. या सर्व या व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून सवलती देण्याबाबत आश्वासित केले.
मतदान करणाऱ्यांसाठी सोने, चांदी कारागीर बहूद्देशीय असोसिएशने "बोटावरची शाई दाखवा आणि दागिन्यांच्या मजूरीवर 20 टक्क्यांची सवलत मिळवा" ही सवलत 20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत दिली आहे. हरभोले कॅफे अमरनाथ् हाईट, अनंत प्राईड शेजारी, हॉकी स्टेडीयम ते कळंबा जेल रोड कोल्हापूर व एल.जी.13 एम्पायर टॉवर, पितळी गणपतीजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर यांच्यावतीने व 20 नोव्हेंबर रोजी मतदान करुन येणाऱ्या पहिल्या 201 मतदारांना 1 दाबेली किंवा 1 हॉट कॉफी फ्री दिली जाणार आहे. त्यानंतर येणाऱ्यांना सर्व ऑर्डरवर 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. 10 टक्के सुटीची सवलत 20 नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. सयाजी हेअर ॲंड ब्युटी कन्सेप्टस, दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर यांच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 पर्यंत सर्व सेवांच्या मजूरीवर 20 टक्के सवलत जाहीर केली आहे.