अंजुम देसाई (कोल्हापूर) - निर्भीड पोलीस टाइम्स कार्यालयातील माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये मागविण्यात आलेल्या महत्वाच्या कागदपत्रांची फाइल्स लंपास करण्यात आली आहे सोबत निर्भीड पोलीस टाइम्सचे परवाने आणि वार्ताहरांच्या वार्षिक करारपत्रांचा संच हि गायब करण्यात आला आहे. सदरची महत्वाची कागदपत्रे आज निर्भीड पोलीस टाइम्सचे संपादक सुशांत पोवार यांनी आवशक्यता असल्याने शोधली असता चुकीच्या उद्देशाने काही अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतून महत्वाची कागदपत्रे लंपास केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस उपअधीक्षक यांना तक्रार देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अग्रगण्य न्यूज पोर्टल म्हणून निर्भीड पोलीस टाइम्सने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. अन्यायाला वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीड पोलीस टाइम्सने जबाबदारी पार पाडली आहे. विविध विभागातील क्राइमशी संबंधित लिखाणासाठी माहिती आवश्यक असते अशा माहितीसाठी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये मागविण्यात आलेल्या माहितीची फाइल्स आज लंपास केल्याचे निदर्शास आल्याने सदरची माहिती तत्काळ पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि शहर पोलीस उपअधीक्षक यांना लेखी तक्रारीद्वारे देण्यात आली आहे. तसेच ज्या विभागाच्या महत्वाच्या माहितीची कागदपत्रे लंपास करण्यात आली आहेत त्या संबंधित विभागास लंपास झालेल्या माहितीची माहिती अधिकार अर्ज पुन्हा मागणी किंवा तशाच फॉरमॅॅटमध्ये लेखी माहितीची मागणी आल्यास तत्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर किंवा शहर पोलीस उपअधीक्षक यांना कळविण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तरी कोणाला या संदर्भात माहिती असल्यास त्यांनी संपादक निर्भीड पोलीस टाइम्स सुशांत पोवार यांना ७३८५९३७९२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.