'सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅन आणि चित्ररथाला श्रीमती काळुशे यांची भेट
schedule27 Jan 25
person by
visibility 77
categoryसिंधुदुर्ग
मकरंद परब (सिंधुदुर्ग) - 'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची' जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने मोबाईल व्हॅन आणि चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाला आज श्रीमती काळुशे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार विरसिंग वसावे, नायब तहसिलदार श्री आढाव, श्री पवार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी श्री चिलवंत यांनी या चित्ररथाविषयी माहिती दिली. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती श्री चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी श्रीमती काळुशे यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.