पन्हाळा तालुक्यात अरुंद रस्त्यामुळे जात आहेत अनेकांचे जीव.......
schedule24 Jan 25
person by
visibility 264
categoryक्राइम न्यूजकोल्हापूर
शशिकांत शेटे (पन्हाळा वार्ताहर) - पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा ते नांदगाव रोड काँक्रे्टीकरण करण्यास गेली अनेक महिन्यापासून काम सुरु आहे तरी कोतोली फाटा ते असुर्ले -पोर्ले पर्यंतचा रस्ता चार पदरी व रुंद झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले असून तिथून पुढचा रस्ता तयार करण्यासाठी ठेकेदार विलंब लावत असल्यामुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तरी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुधवार रोजी कोतोली कडून नांदगाव कडे जाणारी एस.टी. बस ला ओव्हरटेक करताना तेलवे ( ता. पन्हाळा )येथील माजी सरपंच मारुती हरी तांबवेकर ( वय ६५) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली आहे. तरी ही घटना ताजी असतानाच गुरुवार रोजी सकाळी कोलोली पैकी शेलारवाडी येथील गणपती मंदिरासमोरच रस्त्याच्या कामासाठी सिमेंट काँक्रेटचा माल घेऊन जाताना ट्यान्कर रस्ताच्या बाजूला पलटी झाला तरी सुदैवानेवाहतुकीचे प्रमाण कमी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी परिसरातील नागरिकांची व विविध संघटनाची हा रस्ता असुर्ले -पोर्ले मध्ये जसा रस्ता रुंदीकरण झाला आहे त्याच प्रमाणे पुढे व्हावा अशी मागणी होत आहे सदर रस्त्याची रुंदीकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच परिसरातील नागरिकांच्या बरोबर शरद जोशी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनीही सांगितले आहे.