Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक -जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी

schedule31 Oct 24 person by visibility 134 categoryसांगली

संजय तोडकर (सांगली) - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियात प्रसारित करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे. उमेदवारांनी सदर जाहिराती प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात. तसेच, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनीही जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबीची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
टीव्ही, केबल नेटवर्क/ केबल चॅनेल्स, सिनेमा हॉल्स, आकाशवाणी, रेडिओ, एफएम वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या ऑडिओ व्हिज्युअल्स जाहिराती, ई न्यूजपेपरवरील जाहिराती, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस मेसेजेस, सोशल मीडियावरील जाहिराती, इंटरनेट वेबसाईटवरील जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. विविध माध्यमांवर निवडणूक प्रचाराचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अन्य अनुषंगिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes