कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची 2 फेब्रुवारी रोजी सभा
schedule31 Jan 25 person by visibility 109 categoryकोल्हापूर

संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) - जिल्हा नियोजन समितीची सभा रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीस नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली आहे.