गिरीश बुजरे (कोल्हापूर) - अँग्री स्टॅक उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांचे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी काढण्यासाठीचे शिबीर (कॅम्प) तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर दि. 30 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित केले असून सर्व शेतकऱ्यांनी शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
शिबीरासाठी सर्व शेतकरी बांधवानी आवश्यक कागदपत्रे, मोबाईल सह उपस्थित राहून आपले शेतकरी ओळखपत्र बनवून घ्यावे जेणेकरुन भविष्यात सर्व शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
या शिबीरात सर्व शेतकरी खातेदार बांधवांना ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड, 7/12 उतारा, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक इत्यादी.
शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता - अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा, शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.
उद्देश आणि फायदे - खातेदारांचे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी मुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा फॉर्म भरताना सोयीस्कर होईल. सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही. भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. सध्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असल्यास त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. उदा. किसान सन्मान योजना. शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. तसेच शेतकरी योजनांमधून कर्ज यासारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे.