कागल आणि पिराचीवाडीमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न, समरजितसिंह घाटगे यांचा आरोप
schedule20 Nov 24 person by visibility 114 categoryराजकीय घडामोडीकोल्हापूर

सुशांत पोवार (कागल) - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून आनंदात आणि उत्साहामध्ये विधानसभा मतदानाचा प्रारंभ झाला आहे. आज मतदानाच्या पहिल्या दोन तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदवलं गेल असून त्या ठिकाणी ८.७८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कागल मतदारसंघाला कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ समजलं जाते. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक हायहोल्टेज लढत असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे.
कागल मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी बोगस मतदानाचा आरोप केला आहे. कागल शहरामध्ये आणि पिराचीवाडीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार झाला असून तो प्रकार आपल्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडल्याचा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलं आहे. मुश्रीफ असंविधानिक पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील घाडगे यांनी केला. पालकमंत्र्यांकडून दमदाटी होत असल्याचा आरोप घाटगे यांनी केला आहे. घाटगे यांनी प्रशासनाला सुद्धा इशारा देत बोगस मतदानाचा प्रकार होऊ देऊ नये असं म्हटलं आहे. घाटगे यांनी सांगितले की कागल शहरातील एका मतदान केंद्रावर आपल्या कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. पिराचीवाडी गावामध्ये देखील आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटीचा प्रकार घडला, याचा निषेध करत असल्याचे समरजित घाटगे यांनी म्हटलं आहे.