सांगली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना आवाहन
schedule02 Jan 25
person by
visibility 166
categoryसांगली
संजय तोडकर (सांगली) - संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अनुदानाची रक्कम डीबीटी प्रणालीव्दारे लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार आहे. डीबीटी पोर्टलवर आधारकार्ड पडताळणी न झालेले लाभार्थी या लाभापासून वंचित राहू शकतात. तरी या योजनांच्या सर्व लाभार्थींनी त्यांच्या आधारकार्ड व बँक पासबुकची प्रत आधारकार्डला संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकसह आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत त्वरित जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.