Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

दक्षिण सोलापूरमध्ये ५८ टक्के मतदान, ३६२ केंद्रावर चुरशीने मात्र शांततेत मतदान

schedule21 Nov 24 person by visibility 249 categoryमहाराष्ट्र

शिवराज मुगळे (सोलापूर) - सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सहा पर्यंत ५८.३५ टक्के मतदान झाले. एकूण तीन लाख ८२ हजार ७५४ मतदानापैकी २ लाख २३ हजार ३४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 
             सकाळी सात वाजता कुडकुडणाऱ्या थंडीत मतदार लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येऊ लागले होते. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मतदानासाठी चुरस दिसली. सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागासह सर्व केंद्रावर शांततेत मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वच केंद्रावर शांततेत मतदान झाले. या मतदारसंघात भाजपचे सुभाष देशमुख, शिवसेनेचे अमर पाटील व अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यात तिरंगी लढत दिसून आली. 
           सकाळी सात पासून अनेक मतदान केंद्रावर मतदार येत असल्याचे चित्र दिसले. दुपारी बारापर्यंत सर्वच केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पुन्हा चार नंतर मतदारांची संख्या वाढली. 
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे या अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासह मतदान केले. त्यांनी काडादींना आज मतदानाच्या दिवशी पाठिंबा दिला. याचीच चर्चा दिवसभर होती. 
तालुक्यातील सर्वात मोठ्या मंद्रूप गावातील सर्वच बूथवर मोठ्या चुरशीने मतदान झाले. अमोगसिद्ध शेंडगे व मदाप्पा कुमठाळे या दोन्ही ८० वर्षाच्या ज्येष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ६६ टक्के मतदान झाले. एकूणच विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले होते. सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असल्याने मतदानाची टक्केवारी आणखी वाढली. 
भाजपसह शिवसेना व काडादी समर्थक काँग्रेसचे नेते जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी धडपड करताना दिसत होते. माळकवठे येथे मतदान केंद्राजवळ गर्दी केल्याने पोलीसांनी तरुणांना हटकले. मात्र ते ऐकत नसल्याने व पोलिसांनी लाठी चार्ज केला. यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्यासह पोलिसांचा ताफा रात्रीपर्यंत होता. 
याशिवाय भंडारकवठे, विंचूर, कुसुर, कंदलगाव, टाकळी, कुरघोट येथे मतदान करून घेण्यासाठी चुरस दिसली. तसेच होटगी भागातील आहेरवाडी, होटगी स्टेशन, फताटेवाडी, बंकलगी, कणबस, तसेच हत्तुर, औराद, बरूर, हत्तरसंग येथेही चुरशीने चांगले मतदान झाले.

झालेले मतदान असे 
मतदार(पुरुष ) १,९५,७५१, झालेले मतदान ११५६४१
मतदार (स्त्री ) १,८६,९६४, झालेले मतदान १०७६९१
एकूण मतदान ३,८२,७५४, झालेले मतदान २२३३४२

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes