Breaking : bolt
अवयवदान इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसर्वोच्च न्यायालयाचा कालचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय, निवडणूक आयोगासाठी हा मोठा झटका !शंभर दिवसांची सुधारणा विशेष मोहीमेत करवीर आरोग्य विभागाचा तृतीय क्रमांकाने सन्मान, डॉ.उत्तम मदने यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...कागल तालुका आरोग्य विभागाचा महाराष्ट्र शासनाकडून गौरवरासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा त्याग आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रवास....सोलापूरच्या पुरवठादाराची काही अधिकाऱ्यांच्या अवैध खरेदी प्रकरणी थट्टात्मक चर्चा, राजकीय ताणतणाव वाढण्याची शक्यताकोथरूड पोलिसांचा नंगानाच ? नेमकी खाकी असते कशासाठी त्या पीडितांचा सवाल !विश्रामबाग पोलिसांची मोठी कामगिरी; ९०० नशेच्या गोळ्या जप्त, तीन संशयितांना अटकसोन्याच्या दागिन्यांसह रायफल चोरी प्रकरणी संशयिताला अटक"पेटा" वर भारतात बंदी घालण्याची वेळ आली आहे का ? पेटाचं अमेरिकेतील पडद्यामागील वास्तव !

जाहिरात

 

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

schedule04 Apr 24 person by visibility 138 categoryराजकीय घडामोडी

संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्षांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनीधींना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगिक नामनिर्देशन प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, निवडणूक खर्च व्यवस्थापन, राजकीय जाहीरातींचे प्रमाणिकरण व सुविधा पोर्टल इत्यादीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी उपस्थितांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, पक्ष व उमेदवारांना निवडणुकीमधील बारकावे, सर्व नियम आणि आचारसंहिता नियमावली माहित असावी या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला आदर्श आचार संहितेची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. नामनिर्देशन प्रक्रिया उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, निवडणूक खर्च व्यवस्थापन बाबत मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, एक खिडकी योजनेबाबत अति.आयुक्त राहूल रोकडे, जाहीरात प्रमाणिकरणाबाबत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आणि सुविधा पोर्टल बाबतची माहिती एनआयसीचे शैलेंद्र मोटे यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे व जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
 या कार्यशाळेत विविध विषयांसाठी उपस्थित असलेल्या मार्गदर्शकांनी निवडणूकीच्या अनुषंगाने सादरीकरण करून परवानग्या, खर्च आणि नामनिर्देशन पत्राचे नमुने भरणे व सादर करण्याबाबत सादरीकरण केले. राजकीय पक्षांकडूनही यावेळी येणाऱ्या अडचणीवर सविस्तर चर्चा केली. कार्यशाळेच्या समारोपीय मनोगतावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीबाबतची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, 9 सहायक मतदान केंद्रांना मंजुरी मिळाली असून एकूण 3 हजार 368 मतदान केंद्र आहेत. या सर्वच मतदान केंद्रावर किमान सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जर काही ठिकाणी त्रुटी राहिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सांगाव्यात जेणेकरून त्रुटी वेळेत दूर करता येतील. दोन्हीही मतदार संघात 5 एप्रिलपासून प्रशिक्षणास सुरुवात होते आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना व दिव्यांगांना घरपोच मतदानासाठी 12 डी चे जवळपास वाटप करण्यात आले आहेत. जर, अजूनही कोणी राहिले असल्यास बीएलओ किंवा ऑनलाईन स्वरूपात सादर करावा. 12 डी फॉर्म भरून सादर करण्याची अंतिम दिनांक 17 एप्रिल 2024 आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2024 असून उर्वरित मतदारांनी मूदतीपूर्वी नाव नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes