Breaking : bolt
सोलापूरच्या पुरवठादाराची काही अधिकाऱ्यांच्या अवैध खरेदी प्रकरणी थट्टात्मक चर्चा, राजकीय ताणतणाव वाढण्याची शक्यताकोथरूड पोलिसांचा नंगानाच ? नेमकी खाकी असते कशासाठी त्या पीडितांचा सवाल !विश्रामबाग पोलिसांची मोठी कामगिरी; ९०० नशेच्या गोळ्या जप्त, तीन संशयितांना अटकसोन्याच्या दागिन्यांसह रायफल चोरी प्रकरणी संशयिताला अटक"पेटा" वर भारतात बंदी घालण्याची वेळ आली आहे का ? पेटाचं अमेरिकेतील पडद्यामागील वास्तव !पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !

जाहिरात

 

कोथरूड पोलिसांचा नंगानाच ? नेमकी खाकी असते कशासाठी त्या पीडितांचा सवाल !

schedule07 Aug 25 person by visibility 100 categoryसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय) - छत्रपती संभाजीनगरातून पळून आलेल्या एका नवविवाहितेला रात्रभरासाठी आसरा देणे किती भारी पडू शकते याचा अंदाज कदाचित कोथरूड मधील त्या तीन तरुणींना नव्हता. रात्री अपरात्री पोलीस घरात शिरतात. कुठलही वॉरंट नसताना बाथरूम किचनसह संपूर्ण घराची झडती घेतात. एवढं नव्हे तर अक्षरशः अंतरवस्त्राची झडती घेतली जाते. बर एवढं करूनही काही सापडलं नाही म्हणून रोज किती पोरांसोबत झोपता ? असले प्रश्न विचारत मुलींना काहीही कारण न देता थेट पोलीस ठाण्यात आणलं जातं, बर एवढं सगळं होऊनही गुन्हा काय विचारल्यावर मारहान होते. कोथरूड पोलिसांची ही पोलिसिंग सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरते. तसं पाहिलं तर मिसिंग प्रकरण होतं. छत्रपती संभाजीनगरचे परंतु कोथरूड पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून हा नंगानाच केला याचं उत्तर अजून सापडलं नाही. छत्रपती संभाजीनगरातून पळालेली महिला कोथरूडला का पोहोचते ? तिला रात्रभराचा सहारा देत त्या तीन मुली मदत काय करतात ? तिथून सुरू झालेला हा प्रवास अखेर कोथरूड पोलिसांवर गुन्हा दाखल होईपर्यंत कसा आला ? यावर संपादकीय मधून प्रकाशझोत टाकणार आहे.....

                     कोथरूड पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली तीन तरुणींचा मानसिक, शारीरिक छळ करत जातीवाचक शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथून पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आलेल्या एका २३ वर्षीय महिलेला एक रात्र आश्रय दिल्याच्या कारणावरून या तरुणींना लक्ष करण्यात आलं. पीडित तरुणींच्या म्हणण्यानुसार महिलेचा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असलेला सासरा राजकीय दबाव आणि पोलीस यंत्रणा वापरून थेट कोथरूड मध्ये पोहोचला आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत तीन तरुणींच्या खोलीवर छापा टाकण्यात आला. कोणतही वॉरंट नसताना त्यांच्या खोलीत जबरदस्तीने घुसून मोबाईल तपासत कपड्यांची आणि अंतर्वस्त्राची ही झडती घेण्यात आली. त्यानंतर त्या तिघींना पोलीस ठाण्यामध्ये पाच तास जबरदस्तीने चौकशीसाठी बसवून ठेवण्यात आलं. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपनिरीक्षक अमोल कामटे, पोलीस शिपाई संजीवनी शिंदे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या पीएसआय प्रेमा पाटील यांनी अश्लील आणि जातिवाचक शेरेबाजी केल्याचा आरोप केला आहे. तुमच्या रूमवर किती मुले येतात ? लेजबियन आहात का ? तुमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणीही देणार नाही ? असे अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप पीडित तरुणींनी केला. या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात पोहोचले. त्यांनी या प्रकरणी पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, परंतु पोलीस प्रशासनाने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्याबाबत लेखी उत्तरही पोलिसांकडून देण्यात आलं, परंतु मुलींनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासमोरच संबंधित लेखी कागद फाडून, नेमका कोणता गुन्हा दाखल करता येणार नाही ? ते आधी लिहून द्या अशी मागणी केली. दरम्यान या घटनेमुळे तीनही तरुणींना घर मालकांनी खोली रिकामी करण्यास सांगितलं. पीडित तरुणींनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. कोथरूडच हे प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा एक वेळा समजून घेऊया.

                सासरच्या छळामुळे छत्रपती संभाजीनगर मधील एक महिला पुण्यात आली होती. मैत्रिणीने तिला मदत केली. संबंधित महिला कोथरूड मधील तीन युवतींच्या सदनिकेत राहायला आली. त्यानंतर महिलेच्या सासरकडील नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे दिली. महिलेचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. तांत्रिक तपासात संबंधित महिला कोथरूड भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कोथरूड मधील सदनिकेत पोहोचले. तोपर्यंत संबंधित महिला दुसरीकडे गेली होती. पोलिसांनी संबंधित तीन युवतींकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. तपासणीच्या नावाखाली पोलिसांनी कपाटातील कपडे, सामान अस्तव्यस्त केलं. जातीचा उल्लेख करून अपमान केल्याचे युवतींनी तक्रारीत म्हटलं. कोथरूड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील यांनी मुलींना जातीवाचक शिव्या दिल्या. छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले त्यांनी संबंधित मुलीला लाठा बुक्यांनी मारहाण केली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्प सेम आहेत. मग तुम्ही लेसबियन आहात का ? तुम्ही दोघीही दिसताही तशाच, तुम्ही किती तोकडे कपडे घालता ? असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे. वस्तुस्थिती पाहता पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केली नसल्याने अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं पोलिसांच म्हणणं होतं. दुसरीकडे राजकीय दृष्ट्याही हा मुद्दा तापला होता. आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्या कर्तव्य क्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. विशेषतः माजी पोलीस अधिकारी तथा पोलीस नसलेल्या व्यक्ती या तरुणींच्या घरी चौकशीसाठी गेल्या असा संतप्त सवाल यांनी या प्रकरणी उपस्थित केला. हे प्रकरण वरवर दिसतय तेवढं सोपं नाहीये. पोलिसांनी कोणाच्या दबावातून पीडित मुलींशी असे वर्तन केले याचे उत्तर सापडणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे संबंधित पळालेली महिला अद्याप सापडली नाहीये त्यामुळे ती सापडल्यावरच पुढील तपासामध्ये गती येणार एवढे नक्की, पण पोलिसांनी हे सगळं जे केलेल आहे त्यानंतर पोलिसांचा नंगा नाज दिसून आलेला आहे. खाकी असते कशासाठी ? खाकी असते जनतेच्या संरक्षणासाठी, खाकी असते गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी, पण जेव्हा याच खाकीचा दुरुपयोग होतो त्यावेळी प्रश्नचिन्ह हे त्या खाकीवर लागतं आणि खाकी सोबतच खाकी घातलेल्या व्यक्तींवरही लागतं. या केस मध्ये जर त्या तीन तरुणींनी सांगितले ते आरोप जर खरे असतील तर ते तीन पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेतून निलंबितही केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती खटला सुद्धा चालवला पाहिजे अशी एक मागणी होऊ लागली आहे. बाकी या प्रकरणात वास्तव्यास असलेली महिला समोर आल्यावर सत्य बाहेर येणारच आहे............

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes