Breaking : bolt
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण असताना धाराशिवमध्ये बोगस औषधे पोहचली कशी ?आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हाबोगस डॉक्टरांकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर ?दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्यपुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमालातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूकसिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजनसीएमईजीपी मध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक काम झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कामाचे कौतुक

जाहिरात

मतदार ओळख पटविण्यासाठी इपिकशिवाय 12 प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ठरणार ग्राह्य

schedule18 Nov 24 person by visibility 201 categoryसांगली

संजय तोडकर (सांगली) - मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरीक्त (EPIC) इतर 12 प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. मात्र, संबंधिताचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदारांनी आयोगाच्या निर्देशांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरीक्त खालील नमूद कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकतील.

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोष्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिष्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेव्दारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वत्रिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र या कागदपत्रांचा समावेश आहे.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes