शशिकांत शेटे (कोल्हापूर) - पन्हाळा तालुक्यातील केंद्र शाळा कोलोली येथे ७६वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहन पन्हाळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीपती परसू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूह गिते मुलांनी म्हटलीत तरी "संदेसे आते है " या देश गीतावरती मुलीनी लेझीमनृत्य सादर केले या नृत्यासाठी गावातील वृंद नागरिक, पालक व शाळेतील शिक्षकांच्याकडून शाळेचे शिक्षक सखाराम आंगठेकर यांचे विशेष कौतुक होत आहे. तर गावातील स्पर्धा परीक्षेमध्ये यश सपंदान केलेल्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शाळेला काही पालकांनी साधन स्वरूपात मदत केली यांचाही सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्षा पूनम जाधव व सर्व सदस्य, सदस्या व मुख्याध्यापिका सौ. नूतन शशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. पवित्रा विक्रम कांबळे, विकास पाटील, ग्रामसेविका सौ. शोभा पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या विविध सेवाभावी सौस्थांचे पदाधिकारी पालक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.