Breaking : bolt
'Sterile' की 'Non-Sterile' ? जखमांवर उपचार की इन्फेक्शनचे आमंत्रण ? Gloves पुरवठ्यावर FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार"पांढरा कोट दोषी नाही... दोषी आहे रिकाम्या खुर्च्यांचे सरकार..!"औषधांच्या बाटलीत विष कोण ओतत आहे ? सरकार जागे होणार की जनतेचा आक्रोश ऐकू येईपर्यंत झोपणार ?लोकशाहीचा विजय की अधिकारांच्या गैरवापराला न्यायालयाचा लगाम..?तडीपार कायद्याचा उद्देश गुन्हेगारी रोखणे, मतभेद दडपणे नव्हे..!घोषणाबाजी म्हणजे गुन्हा नव्हे, लोकशाहीचा श्वास गुदमरवणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा ठोस इशारा..!शिवसेनेचे उद्याचे राजकारण, वारशाची लढाई, नेतृत्वाची परीक्षा आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्नफुटीनंतरचे नेतृत्व, बदलत्या महाराष्ट्रात जनसंपर्क, प्रशासन आणि विश्वासाची नवी परीक्षाशिवसेनेची ऐतिहासिक फूट, एका पक्षाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची निर्णायक वळणकथा"पांढरा कोट... विश्वासाची शान; जीव वाचविण्यातच डॉक्टरांची ओळख महान !"

जाहिरात

 

'Sterile' की 'Non-Sterile' ? जखमांवर उपचार की इन्फेक्शनचे आमंत्रण ? Gloves पुरवठ्यावर FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार

schedule08 Jul 26 person by visibility 27 categoryमहाराष्ट्रकोल्हापूर

संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) - कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या Surgical Gloves संदर्भात अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन (FDA) स्तरावर सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध नमुन्यांमध्ये आणि लेबलिंगमध्ये दिसून आलेल्या विसंगतींमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात निर्भीड पोलीस टाइम्सचे संपादक सुशांत मनोहर पोवार यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ.तुकाराम मुंडे यांच्याकडे ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
            प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी आरोग्य सेवेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आधार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवून उपचारासाठी येतात. अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेवरच रुग्णाचा जीव आणि उपचारांचे यश अवलंबून असते. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ खरेदीतील अनियमितता म्हणून नव्हे, तर रुग्ण सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब म्हणून पाहण्याची गरज आहे.

लेबलवर एक माहिती, बॉक्सवर दुसरी नेमके सत्य काय ? 

           तक्रारीनुसार उपलब्ध नमुन्यांमध्ये बॉक्सच्या दर्शनी भागावर "Sterile Surgical Gloves" असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र त्याच उत्पादनावरील लेबलवर "Non-Sterile Surgical Gloves" असे नमूद करण्यात आले आहे. एकाच उत्पादनावर दोन परस्परविरोधी माहिती का देण्यात आली ? हा केवळ मुद्रणदोष आहे की चुकीचे लेबलिंग ? किंवा पुरवठ्याच्या प्रक्रियेत काही गंभीर अनियमितता झाली आहे का ? याचे उत्तर केवळ सक्षम तपास यंत्रणाच देऊ शकते. जर मंजूर स्पेसिफिकेशननुसार निर्जंतुक (Sterile) ग्लोव्हजचा पुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात वेगळ्या प्रकारचे उत्पादन पुरवठा झाले असेल, तर या संपूर्ण खरेदी प्रक्रियेची चौकशी होणे आवश्यक आहे.

पॅकेजिंगवरूनही निर्माण झाले प्रश्न

         तक्रारीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. साधारणपणे निर्जंतुक Surgical Gloves प्रत्येक जोडीचे स्वतंत्र सीलबंद पॅकमध्ये उपलब्ध असतात. मात्र उपलब्ध नमुन्यांमध्ये अनेक ग्लोव्हज एकाच बॉक्समध्ये भरलेले असल्याचे दिसते. तसेच बॉक्सवर मूळ संख्येत हाताने बदल केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. बॉक्सची क्षमता 50 ग्लोजची उत्पादकाने छापील टाकलेली असताना त्यावर हाताने 100 नग करून क्षमतेपेक्षा डबल नग बॉक्समध्ये बसतील का ? डबल नग बसत असतील तर उत्पादक असे अर्धे रिकामे बॉक्स पुरवठादारांना देतील का? या सर्व बाबींची वैज्ञानिक आणि तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

१५ दिवसांपासून पाठपुरावा; मात्र अधिकृत उत्तर नाही

          या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे तोंडी स्वरूपात पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित ग्लोव्हज योग्य नसल्यास पुरवठा थांबवून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र अधिकृत स्वरूपात कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेचा लोड जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांना ही यामध्ये दोषी बोलणे योग्य राहणार नाही पण त्यांच्याकडून या गंभीर प्रकरणात कारवाईसाठी वेळ मिळत नसल्याने FDA ची दारे ठोटावण्यात आलीत असे सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात. जखमेची ड्रेसिंग, लहान शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय प्रक्रियांमध्ये Surgical Gloves चा वापर होत असतो. त्यामुळे संबंधित उत्पादनाचे स्वरूप, दर्जा आणि वापर कोणत्या प्रक्रियेत झाला, याची वस्तुनिष्ठ चौकशी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.

FDA कडे काय मागण्या ?

          तक्रारीमध्ये पुढील बाबींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे:
1) मंजूर तांत्रिक मान्यतेनुसारच पुरवठा झाला का ?
2) पुरवठा आदेशातील स्पेसिफिकेशन आणि प्रत्यक्ष पुरवठा यामध्ये सुसंगती आहे का ?
3) Batch Number आणि उत्पादन तपशीलांची पडताळणी.
4) Delivery Challan आणि वितरण साखळीची तपासणी.
5) संबंधित ग्लोव्हजचा प्रत्यक्ष कोणत्या वैद्यकीय प्रक्रियांसाठी वापर झाला ?
6) बॉक्स आणि लेबलवरील विसंगतीची चौकशी.
7) पॅकेजिंग आणि नमुन्यांचे प्रयोगशाळा परीक्षण.

पुरावेही सादर

          तक्रारीसोबत संबंधित उत्पादनाचे छायाचित्र, लेबल, बॅच क्रमांकाचे फोटो आणि उपलब्ध नमुन्यांची माहिती FDA कडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आवश्यक असल्यास प्रत्यक्ष नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासादरम्यान शासनाची दिशाभूल, चुकीचे लेबलिंग, स्पेसिफिकेशन विरुद्ध पुरवठा किंवा इतर कोणतीही अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित उत्पादक, पुरवठादार आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निर्भीड पोलीस टाइम्सचा प्रश्न

         शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवणे ही प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात वस्तुस्थिती नेमकी काय आहे, पुरवठा नियमानुसार झाला का, आणि रुग्ण सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण झाला आहे का, याचे स्पष्ट उत्तर आता चौकशीतून समोर येणे गरजेचे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes