Breaking : bolt
“निधी मंजूर, तरी लाभार्थी वंचित ! सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्या कारभारावर मायकल डिसोझांचा घणाघाती हल्लाबोल !”“एका महान सुपुत्राची चिता अजून धगधगतेय… आणि सत्तेच्या लोकार्पणाची दिवाळी उजळतेय ! १८ ऑगस्टनंतर पुन्हा दौरा, मग ९ ऑगस्टची घाई कशाला..?”सावंतवाडीच्या इतिहासाचे काटे थांबले, प्रशासनाची वेळ कधी येणार ?“मंत्री - अधिकाऱ्यांची नावे पत्रिकेत झळकली… सिव्हिल सर्जन मात्र गायब !”साताऱ्यातील वाईच्या रुग्णालयात औषध की विषाचा डोस..?"ज्याने तुमच्या घरातील तीन पिढ्या सांभाळल्या... त्या डॉक्टरला तुम्ही एका झगमगत्या बोर्डासाठी विसरलात का..?"काळालाही हरवणारा शिक्षणमहर्षी...! पद्मश्री डॉ.डी. वाय.पाटील यांना 'निर्भीड पोलीस टाइम्स'ची कृतज्ञ आदरांजली"प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ला ? आधी पत्रकारांची बदनामी, आता मंत्र्यांच्या नावाने अफवा पसरवल्याचा दावा..?"'पदे रिक्त... कारभार अतिरिक्त, महत्वाच्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी अतिरिक्त कार्यभाराची संस्कृती किती दिवस सुरु राहणार...?"औषधांशिवाय ग्रामीण रुग्णालये... नियोजनातील हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना, वाढत्या जनआक्रोशासमोर आरोग्यमंत्र्यांची खरी परीक्षा..!"

जाहिरात

 

सैनिक कल्याण विभागामध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची होणार भरती ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

schedule21 Nov 25 person by visibility 267 categoryपुणे

पुणे प्रतिनिधी - सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) या पदांकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी १ पद असून ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.

भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांचे माध्यमातून होणार आहे. इच्छुकांनी अर्ज ऑनलाईनच करावेत, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज २६ नोव्हेंबर २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत स्विकारले जातील.

या भरतीबाबत सविस्तर माहिती व अटी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes