Breaking : bolt
पुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?बच्चूभाऊ कडूंना आमदारकी मिळणार की फक्त फुगवठा ? पक्ष विलीन करणार का ? सार्वजनिक आरोग्य मंत्रीपद.......?शासनाच्या यादीवर नसणाऱ्या उपकरणांना तांत्रिक मान्यता देणाऱ्या उपसंचलकांच्या विभागीय चौकशीसाठी आज आयुक्तांना निवेदन सादरजिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. वाडीकर, डॉ. देशमुख यांच्यासह तिघे निलंबित पण ही शासनासाठी धोक्याची घंटा.....नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख निलंबित..!गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच, बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', बडा वैद्यकीय अधिकारी गजाआड

जाहिरात

 

परराज्यातील पशूंचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करावी - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

schedule14 Nov 25 person by visibility 153 categoryमहाराष्ट्र

अमरावती प्रतिनिधी - इतर राज्यातून येणाऱ्या पशूंमुळे लंपीसारख्या आजार संसर्गामुळे झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पशूची तपासणी करून टॅगींग करावे, तसेच संसर्ग टाळण्यासाठी दक्ष राहून उपाययोजना करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पशूसंवर्धन आणि दुग्ध विकासासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पशूसंवर्धनचे उपायुक्त डॉ. कावरे, विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे डॉ. आडे आदी उपस्थित होते.

                     जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यातील पशूधनाचे आजारापासून संरक्षण करून पशूधनाचा विकास साधावा, यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पशू पालकांचा गट तयार करावा. प्रामुख्याने चिखलदरा आणि धारणी भागात लाभार्थी शोधून त्यांनाही योजनांचा लाभ देण्यात यावा. जिल्ह्यात अशा प्रकारचे गट निर्माण झाल्यास त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येतील. यातून जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या वाढण्यास मदत होईल. तंत्रज्ञान, खाद्य, आरोग्याची काळजी घेतल्यास दुध संकलनात वाढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

                 पशूसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरांचे वाटप अनुदानावर करण्यात येते. यात चांगले कार्य करण्यासाठी क्षेत्रियस्तरावर कार्यरत यंत्रणांनी मार्गदर्शन करावे. वैरण विकास योजनेत चारा उत्पादन होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच चांगल्या प्रजाती निर्माण होण्यासाठी कृत्रिम रेतनासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. चांगल्या पशूधनाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पशूपालक आणि शेतकरी हे एकत्रित असल्याने कृषि विभागानेही यात नियोजन करावे, तसेच पशूविकास आणि दुग्ध व्यवसायातून कृषि उद्योजक तयार करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes