Breaking : bolt
"औषधांशिवाय ग्रामीण रुग्णालये... नियोजनातील हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना, वाढत्या जनआक्रोशासमोर आरोग्यमंत्र्यांची खरी परीक्षा..!""आरोग्य व्यवस्थेतील 'रेट कॉन्ट्रॅक्ट'चा खेळ की शासनाची फसवणूक ? पट्ठ्याने ESIC ची RC एडिट करून शासकीय पुरवठा आदेश मिळवल्याचा गंभीर आरोप, बीडमध्ये दस्तऐवजांच्या शोधासाठी 'निर्भीड पोलीस टाइम्स'ची मोहीम !""अनुभवाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह ! कोल्हापूर जिल्ह्यात औषध टंचाई तीव्र; निविदा विलंबामुळे आरोग्य व्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर ?""एक बदली... आणि औषध व्यवस्थेचा विस्कटलेला ताळमेळ ? कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेत औषध टंचाईचा गंभीर इशारा, गारगोटी ग्रामीण रुग्णालयाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार ?""गरीबांच्या हाडांवर उपचार की नियमांना हरताळ ? सिंधुदुर्गातील PFNA-2 खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह..!"आयुक्त महोदय... फुलांचे गुच्छ नव्हे, तर कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेचा काळाकुट्ट चेहरा तुमच्या हातात उद्या दिला जाणार आहे..!"खानविलकरांच्या सुवर्णकाळापासून आबिटकरांच्या नव्या पर्वापर्यंत कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेची खरी कसोटी, कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला आता धाडसी शस्त्रक्रियेची गरज..!"कोल्हापूर आरोग्य विभागात प्रतिनियुक्ती आणि पदोन्नती प्रक्रियेवर संशयाचे सावट ? नियम की मनमानी, कर्मचारी संघटनांची नाराजीतून चौकशीची तीव्र मागणी"कसबा बावड्यात रक्तरंजित हल्ला... सेवा रुग्णालयातही राडा!"महिलेने न्याय मागितला... व्यवस्थेने बदली दिली ? कोल्हापुरातील आरोग्य विभागात महिलेचा सन्मान की व्यवस्थेचा अपमान ? बदलीच्या फाईलमागील झारीतील शुक्राचार्याला जनता शोधतेय !"

जाहिरात

 

समर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावा

schedule04 May 26 person by visibility 324 categoryसिंधुदुर्गआरोग्य विभाग

सुशांत पोवार (सिंधुदुर्ग) - डॉ.सतिश सूर्यवंशी (सहाय्यक उपसंचालक, आरोग्य, कोल्हापूर विभाग) यांनी दिनांक २ मे रोजी जाधव व दीपक वरक यांच्या समवेत ग्रामीण रुग्णालय पेंडूर–कट्टा, ता. मालवण येथे भेट देऊन महाडायलिसिस अंतर्गत सुरू असलेल्या डायलिसिस सेवांचा आढावा घेतला व सेवांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालय पेंडूर–कट्टा येथे महाडायलिसिस अंतर्गत एकूण ४६ क्रॉनिक रेनल फेल्युअर (सिआरएफ) रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी १३ रुग्ण सध्या नियमित उपचार घेत आहेत.  आमदार निलेश राणे यांच्या हस्ते जुलै २०२५ मध्ये डायलिसिस केंद्राचे लोकार्पण झाल्यापासून आजपर्यंत एकूण ९०४ डायलिसिस सत्रे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.
            तसेच, ग्रामीण रुग्णालय मालवण येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत चालणाऱ्या डायलिसिस सेवांमध्ये ३५ (सिआरएफ) रुग्णांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ११ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. येथे एकूण १२०० पेक्षा अधिक डायलिसिस सत्रे यशस्वीरित्या पार पडली आहेत. MH STEMI ECG प्रकल्प, सिंधुदुर्ग अंतर्गत ग्रामीण रुग्णालय पेंडूर–कट्टा येथे एकूण १४७४ इसिजी नोंदी करण्यात आल्या असून, त्यापैकी ८० गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये वेळेवर उपचार व आवश्यक ते रेफरल देण्यात आले. यामध्ये ६ गंभीर हार्ट अटॅक (एआयएम) प्रकरणांचा समावेश आहे.
           ग्रामीण रुग्णालय मालवण येथे एकूण ४१५६ इसिजी नोंदींपैकी १५६ गंभीर हृदयविकारग्रस्त रुग्ण ओळखण्यात आले. त्यापैकी २३ हार्ट अटॅक (STEMI) रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. सदर कामगिरी ही आरोग्य सेवेतील सेवाभाव, समर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण असून ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यसंघासाठी हा अभिमानास्पद व प्रेरणादायी क्षण आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes