कोयना-दौलत डोंगरी पर्यटन महोत्सव - २०२६ चे आयोजन
schedule31 Mar 26
person by
visibility 108
categoryपुणे
पुणे प्रतिनिधी - राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना-दौलत डोंगरी पर्यटन महोत्सव, २०२६ चे २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत दौलतनगर, मरळी, ता. पाटण, जि. सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवादरम्यान पर्यटकांसाठी पॅराग्लायडिंग, बोटींग, खाद्य महोत्सव, शस्त्र प्रदर्शन तसेच कृषी, पशु-पक्षी व महिला बचत गटांचे प्रदर्शन, फनफेअर आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नामांकित शाहीरांकडून पोवाडा सादरीकरण, भजनी मंडळ स्पर्धा, ब्रास बँड पथक वादन, लेझर शो, ड्रोन शो, लावणी महोत्सव तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
या महोत्सवाला पर्यटक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालय उपसंचालक भरत लांघी करण्यात आले आहे.