Breaking : bolt
"प्रोटोकॉल ज्याचा, औषध खरेदी त्याची, मग ई-टेंडरमधील स्पर्धा नेमकी कुणासाठी ?""मक्तेदारी विरुद्ध पारदर्शकता, सुशांत पोवारांच्या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाची चौकशीची घंटा !"कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेचे खरे शिलेदार बदनामीच्या फेऱ्यात.....?मंत्रीपदाच्या चर्चां दरम्यान उफाळलेला वाद, आमदार राजेश क्षीरसागरांसमोरील डॅमेज कंट्रोलचे आव्हान ?ऊसतोड कामगार महिलांची वेदनादायी वास्तवता, गर्भाशय काढण्यामागची सामाजिक शोकांतिकापुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती यांच्या नूतन दालन प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न

schedule04 Apr 26 person by visibility 193 categoryकोल्हापूरआरोग्य विभाग

सुशांत पोवार (कोल्हापूर) - कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती सौ. सारिका यशवंत नांदेकर यांच्या नूतन दालन प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी हा विचार फक्त बोलण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणून ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींना महत्त्वाची पदे दिली आहेत. याप्रसंगी सौ. सारिका नांदेकर यांनी स्वतःला केवळ एका जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रतिनिधी न समजता बारा तालुक्यांच्या सभापती समजावे आणि विकसित महाराष्ट्राच्या व्हिजनसाठी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहनही यावेळी केले.

             या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, आमदार अशोकबापू माने, माजी खासदार संजय मंडलिक, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, के.जी.नांदेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शिवसेना जि.प.गटनेते अरुण जाधव, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कृषी संचालक दत्तात्रय उगले, शिक्षण सभापती शितल यादव, जि.प.सदस्या रोहिणी आबिटकर, पंचायत समिती सभापती विक्रम पाटील, संतोष जोशी, अभय तेंडुलकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes